विद्यार्थ्यांनो मोठी उत्तरे लक्षात ठेवणे कठीण जातय? मग पाठांतराच्या ‘या’ सोप्या टिप्स नक्की वाचा

Study Tips For Remember Long Answers: सध्या सर्वत्र परीक्षांचे वातावरण आहे. अगदी शाळेपासून ते महाविद्यालयापर्यंत विद्यार्थी जोमाने अभ्यासाला लागले आहेत. अभ्यासतील सर्वात महत्वाचा भाग असतो ते म्हणजे पाठांतर. प्रश्नपत्रिकेच्या स्वरुपातील इतर प्रश्न लगेच पाठ होतात पण मोठी उत्तरे पाठ करण्यासाठी विद्यार्थ्यांना विशेष मेहनत घ्यावी लागते. शिवाय त्या प्रश्नांना गुण जास्त असल्याने त्याकडे दुर्लक्ष करूनही चालत नाही. त्यामुळे ही मोठी उत्तरे पाठ कशी करायची असा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे असतो.

मग प्रत्येकजन आपापल्या पद्धतीने ही उत्तरे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतात पण तरीही अनेकदा कुठे मुद्दे विसरले जातात तर कधी उत्तर लिहिताना गोंधळ उडतो. त्यामुळे मोठी उत्तरे लिहिणे हे विद्यार्थ्यांना आव्हानात्मक वाटत असते. पण जर योग्य पद्धतीने पाठांतर केले तर मोठी उत्तरेही सहज पाठ करता येतील. त्यासाठी काही खास टिप्स पाहूया, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा अवघड अभ्यास सोपा होईल.

विषय समजून घ्या: अभ्यास करताना संबधित विषयात नेमके मांडायचे काय आहे ते लक्षात घेणे सर्वात महत्वाचे आहे. पाठांतर करताना अडचण येते कारण मुद्दा समजलेला नसतो. एकदा मुद्दा लक्षात आला की उत्तरे आपल्या भाषेत देखील लिहिता येतात. म्हणून एखादा विषय मनापासून समजून घेण्याचा प्रयत्न करा. एकदा त्यातली संकल्पना तुम्हाला स्पष्ट झाली ही उत्तर लिहिणे सोपे होते.

स्वतःच्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करा: विद्यार्थी पुस्तकात, गाईडमध्ये किंवा संबधित पाठांतर करण्याच्या साहित्यात जसे आणि ज्या शब्दात उत्तर लिहिले आहे तसेच पाठ करण्याचा प्रयत्न करतात. अगदी शब्दशः पाठांतर करण्याकडे त्यांचा कल असतो. पण ती पुस्तकी भाषा असल्याने त्या पद्धतीचे पाठांतर जड जाते. म्हणून उत्तरात काय लिहायचे आहे याचे केवळ मुद्दे समजून घ्या. एकदा मुद्दे लक्षात आले की त्यानुसार स्वतःच्या शब्दात ते मांडण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे मोठी उत्तरे सहज लिहिता येतील.

(वाचा: Mumbai University News: मुंबई विद्यापीठाच्या बीकॉम सत्र ५ ची परीक्षा आजपासून, अचूकतेसाठी नव्या प्रणालीचा अवलंब)

वाचन आणि स्मरण: पाठांतर करण्याआधी संबधित पुस्तक, धडा, उत्तरे आधी नजरेखालून घाला. त्यात काय लिहिले आहे ते पाहून घ्या. मग त्याचे तीन ते चार वेळा वाचन करा. मोठयाने वाचन केल्याने अधिक फायदा होतो. वाचता वाचता विषय समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर पुस्तक बंद करून वाचलेले आठवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला पाठांतरासाठी याचा नक्की फायदा होईल.

लिहिण्याची सवय लावा: पाठांतर करण्यासाठी सर्वात उत्तम ट्रिक म्हणजे लिहून काढणे. कारण एखादे उत्तर लिहिताना आपण आधी ते वाचतो, मग लिहिताना स्वतःशीच बोलत ते लिहितो. मग आपण लिहिलेले बरोबर आहे का हे पाहण्यासाठी पुन्हा एकदा वाचतो. त्यामुळे एक उत्तर लिहिताना तीन ते चार वेळा वाचन होते. शिवाय त्या उत्तरातील मुद्दे, शब्द आपल्या नजरेखालून जातात. ते लिहिण्याचा देखील सराव होतो. पाठांतरासाठी ही सर्वात महत्वाची युक्ती मानली जाते

सातत्य आणि सराव: अभ्यासातील नियमितता हेच यशाचे खरे सूत्र आहे. तुम्ही आज एक उत्तर वाचाल आणि एका महिन्याने त्याचा सराव कराल तर तसे चालणार नाही. अभ्यासात सातत्य महत्वाचे असते. एखादी गोष्ट लक्षात राहीपर्यंत ती सातत्याने वाचली पाहिजे, त्याचा सराव केला पाहिजे. सरावाने गोष्टी कायमच्या अंगीभूत होतात. तुम्हाला पाठांतर करयाचे असेल तर प्रत्यक विषयाला एक वेळ ठरवून त्याचा सराव करायला हवा.

(वाचा: Work Management Tips: ऑफिसच्या कामांचे उत्तम नियोजन करण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा)

Source link

pathantar kase karavestudy tipsstudy tips and tricksstudy tips for studentअभ्यास कसा करावापाठांतर करण्याच्या टिप्स
Comments (0)
Add Comment