‘आरसीएफएल’च्या मुंबई आणि रायगड केंद्रासाठी ही भरती असून नुकतीच याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले असून ०७ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तसेच उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. तेव्हा या भरतीप्रक्रियेतील पदे, पात्रता, वेतन आणि सविस्तर माहिती पाहूया.
‘राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
पदवीधर प्रशिक्षणार्थी – १५७ जागा
तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी – ११५ जागा
ट्रेड प्रशिक्षणार्थी – १३६ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ४०८ जागा
पात्रता:
पदवीधर प्रशिक्षणार्थी – संबधित विषयातील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक
तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी – संबधित विषयातील अभियांत्रिकी डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ट्रेड प्रशिक्षणार्थी – विज्ञान शाखेतून संबधित विषयात बारावी किंवा पदवीधर असणे आवश्यक आहे.
(वाचा: Study Tips: विद्यार्थ्यांनो मोठी उत्तरे लक्षात ठेवणे कठीण जातय? मग पाठांतराच्या ‘या’ सोप्या टिप्स नक्की वाचा)
स्टायपेंड:
पदवीधर प्रशिक्षणार्थी – ९ हजार
तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी – ८ हजार
ट्रेड प्रशिक्षणार्थी – ७ हजार
नोकरी ठिकाण: मुंबई आणि रायगड
वयोमर्यादा: किमान २५ वर्षे ते कमाल ५० वर्षे
अर्ज पद्धती: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०७ नोव्हेंबर २०२३ (सायंकाळी ०५ वाजेपर्यंत)
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरतीसंदर्भात अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरतीकरिता थेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्ज शेवटच्या तारखे नंतर म्हणजे ०७ नोव्हेंबर नंतर आल्यास ग्राह्य धरला जाणार नाही.
(वाचा: Work Management Tips: ऑफिसच्या कामांचे उत्तम नियोजन करण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा)