अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर येथे मोठी भरती, ‘या’ पदांसाठी करा अर्ज

एम्स – नागपूर, म्हणजेच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर येथे विविध पदांसाठी भरती सुरू आहे. या भरतीद्वारे संस्थेतील असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर या पदांच्या एकूण ९० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच याबाबत संस्थेने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने करायचे असून १८ नोव्हेंबर २०२३ ही ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तर २५ नोव्हेंबर ही पोस्टाद्वारे ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरती प्रक्रियेतील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज करण्याची पद्धत याची सविस्तर माहिती पाहूया.

(फोटो सौजन्य – Yappe.in)

‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
असोसिएट प्रोफेसर – २० जागा
असिस्टंट प्रोफेसर – ७० जागा
एकूण रिक्त पदसंख्या: ९० जागा

शैक्षणिक पात्रता:
असोसिएट प्रोफेसर – कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून एमडी/ एमएस उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच अध्यापनाचा ६ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
असिस्टंट प्रोफेसर – कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून एमडी/ एमएस उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच अध्यापनाचा ३ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
(या व्यतिरिक्त सविस्तर पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली आहे)

(वाचा: Study Tips: विद्यार्थ्यांनो मोठी उत्तरे लक्षात ठेवणे कठीण जातय? मग पाठांतराच्या ‘या’ सोप्या टिप्स नक्की वाचा)

नोकरी ठिकाण: नागपूर

वेतन:
असोसिएट प्रोफेसर – १ लाख ३८ हजार ३०० ते २ लाख ९ हजार २००
असिस्टंट प्रोफेसर – १ लाख १ हजार ५०० ते १ लाख ६७ हजार ४००

अर्ज शुल्क:
सामान्य/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस या श्रेणीतील उमेदवारांना १००० रुपये तर एससी/एसटी श्रेणीतील उमेदवारांसाठी ८०० रुपये

अर्ज पद्धती: ऑनलाइन आणि ऑफलाइन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १८ नोव्हेंबर २०२३

ऑफलाइन (पोस्ट द्वारे) अर्ज करण्याची शेवटची तारीख: २५ नोव्हेंबर २०२३

ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता: कार्यकारी संचालक, एम्स नागपूर, एडमिनीस्ट्रेटिव्ह ब्लॉक, प्लॉट नं २, सेक्टर २०,नागपूर ४४११०८.

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरतीसंदर्भात अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरतीकरिता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

(वाचा: Work Management Tips: ऑफिसच्या कामांचे उत्तम नियोजन करण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा)

Source link

AIIMS Nagpur bharti 2023AIIMS Nagpur Recruitment 2023all india institute of medical sciences jobsअखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरतीएम्स नागपूर भरती २०२३प्राध्यापक भरती
Comments (0)
Add Comment