CA चा अभ्यास मध्येच सोडणं म्हणजे करिअरचा शेवट झाला असा गैरसमज आहे. खरे पाहता CA ड्रॉपआउट्ससाठी देखील करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. हे पर्याय तुम्हाला चांगल्या पॅकेजची नोकरी मिळवून देवू शकतात. मग, जाणून घेऊया करिअरच्या या वेगळ्या या पर्यायांविषयी :
डेटा विश्लेषक (Data Analyst) :
सध्या विविध क्षेत्रातील अनेक नामांकित कंपन्यांमध्ये डेटा विश्लेषकांना मोठी मागणी आहे. डेटा विश्लेषणाची आवड असणार्या आणि सीएच अभ्यासक्रम सोडल्यानंतर जे उत्तम करिअरच्या संधीच्या शोहात आहेत अशा लोकांसाठी Data Analytics हा करिअरचा चांगला पर्याय ठरू शकतो. भारतातील डेटा विश्लेषकांना वर्षाला सरासरी १३ लाख रुपयांपर्यंत पगार मिळतो.
(वाचा : Indian Post Recruitment 2023: भारतीय टपाल विभागात ‘स्टाफ कार ड्रायव्हर’ पदासाठी भरती, असा करा अर्ज)
आर्थिक विश्लेषक (Economic Analyst) :
सीए शाखेशी साधर्म्य साधणारे ‘वित्तीय विश्लेषणा’चे क्षेत्र आहे. आर्थिक विश्लेषकाचे काम डेटाचे विश्लेषण करून संस्थेच्या आर्थिक उलाढालिंची तपासणी करण्याचे काम करतात. Economic Analyst यांच्या विश्लेषणाच्या आधारे व्यवसायाशी संबंधित योग्य निर्णय घेण्यास मदत होते. भारतातील आर्थिक विश्लेषक म्हणून काम करणार्या व्यक्तीला वर्षाला साधारणपणे १५ लाख रुपये पगार मिळतो.
CA फर्म ऑडिटर (CA Firm Auditor) :
तुमच्यासाठी ऑडिटर म्हणून करिअरचा उत्तम पर्याय आहे. प्रत्येक CA ला त्याच्या फर्मसाठी ऑडिटरची गरज असते. सीए ड्रॉपआउट झालेली किंवा ते क्षेत्र सोडलेली व्यक्ति सीए फर्म ऑडिटर म्हणून काम करून, लाखो रुपये कमवू शकते. सीए फर्म ऑडिटरचा सरासरी पगार वर्षाला सुमारे १२ लाख एवढा असतो.
व्यवस्थापन सल्लागार (Management Consultant) :
व्यवसाय संस्थेतील गुंतागुंतीच्या व्यावसायिक समस्यांचे निराकरण करण्याचे काम व्यवस्थापन सल्लागार करतात. याशिवाय, कार्यक्षमतेत सुधारणा करून एकूण कामगिरीलाही चालना द्यावी लागेल. Glassdoor या नामांकित वेबसाइटच्या सर्वेक्षणांनुसार भारतातील व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम करणार्या व्यक्तीला दरवर्षी २६ लाख रुपये पगार मिळतो.
(वाचा : BHEL Recruitment 2023: बीएचईएलमध्ये विविध पदांच्या तब्बल ७५ जागांसाठी भरती; २५ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया)