या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. पात्र उमेदवारांची मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार असून ३० ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीप्रकियेतील पदे, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया आणि मुलाखतीची तारीख याचे सविस्तर माहिती पाहूया.
‘मिरा भाईंदर महानगरपालिका २०२३ भरती’ मधील पदे आणि पात्रता:
विशेष कार्य अधिकारी – ०१ जागा
नायब तहसिलदार – ०१ जागा
उपअभियंता – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०३ जागा
पात्रता:
विशेष कार्य अधिकारी- नगररचना विभागात शासकीय/निमशासकीय सेवेत वर्ग ०१ मधील पदावर किमान ०५ वर्षे अथवा वर्ग ०२ मधील पदावर किमान १० वर्षे कामकाजाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
नायब तहसिलदार – महसुल विभागात शासकीय/निमशासकीय सेवेत वर्ग ०२ मधील पदावर किमान ०५ वर्षे कामकाजाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
उपअभियंता – सार्वजनिक बांधकाम विभागात शासकीय/निमशासकीय सेवेत वर्ग- ०१ मधील पदावर किमान ०५ वर्षे अथवा वर्ग – ०२ मधील पदावर १० वर्षे कामकाजाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
(वाचा: Career In Anchoring: ‘निवेदक’ म्हणून करता येईल करिअर; या गोष्टी आजच आत्मसात करा..)
नोकरी ठिकाण: भाईंदर
अर्ज पद्धती: ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: आवक-जावक विभाग, मिरा भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, स्व इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० ऑक्टोबर २०२३
निवड प्रक्रिया: मुलाखतीद्वारे
मुलाखतीची तारीख: ०१ नोव्हेंबर २०२३
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘मिरा भाईंदर महानगरपालिका’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरतीसंदर्भात अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
(वाचा: Work Management Tips: ऑफिसच्या कामांचे उत्तम नियोजन करण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा)