भारताच्या Territorial Army मध्ये ‘ऑफिसर’ पदावर भरती सुरु; कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर करू शकणार अर्ज

Territorial Army Recruitment 2023: देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. इंडियन टेरिटोरियल आर्मीने म्हणजेच भारतीय प्रादेशिक सेनेमध्ये ऑफिसर पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, या भरतीच्या माध्यमातून एकूण १९ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०२३ असणार आहे.

(फोटो सौजन्य : इंडियन टेरिटोरियल आर्मी अधिकृत वेबसाइट)

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते ४२ वर्षांच्या दरम्यान असावी. उमेदवार हा सर्व बाबतीत शारीरिक आणि वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे.
पदभरतीचा तपशील :

संस्था : इंडियन टेरिटोरियल आर्मी (भारतीय प्रादेशिक सेना)
भरले जाणारे पद : प्रादेशिक सेना अधिकारी
अर्ज करण्याची पध्दत : संपूर्णतः ऑनलाइन
नोकरी करण्याचे ठिकाण : संपूर्ण भारतात कुठेही

एकूण रिक्त जागा : १९
पुरुष उमेदवारांसाठी : १८ जागा
महिला उमेदवारासाठी : १ जागा
(उपरोक्त पद संख्या आणि उमेदवारांची निवड ही संपूर्णपणे मेरीटवर अवलंबून असून, या जागांमध्ये वाढ, घट अथवा बदल करण्याचे सर्व हक्क सदर संस्थेकडे आहेत.)

(वाचा : सीए ड्रॉपआऊट आहात..? टेंशन घ्यायची गरज नाही; CA क्षेत्राशी जवळीक साधणार्‍या ‘या’ नोकर्‍या देतील लाखोंत पगार)

पात्रता :

  • इंडियन टेरिटोरियल आर्मीच्या Territorial Army Officers पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते ४२ वर्षांच्या दरम्यान असावी. म्हणजेच, २१ नोव्हेंबर २०२३ पर्यंत उमेदवाराने वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली असावी व २१ नोव्हेंबर २०२३ रोजी उमेदवारचे वय ४२ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  • या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतील कोणत्याही शाखेमधून पदवीधर असणे आवश्यक आहे.
  • उमेदवार हा सर्व बाबतीत शारीरिक आणि वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे.

महत्त्वाच्या तारखा :
ऑनलाइन अर्ज : २३ ऑक्टोबर २०२३ (सकाळी १० वाजल्यापासून) ते २१ नोव्हेंबर २०२३ (रात्री ११ वाजून ५५ मिनिटांपर्यंत)

ऑनलाइन प्रवेश परीक्षा : डिसेंबर महिन्याच्या ३ र्‍या किंवा ४ थ्या आठवड्यात (ही तारीख अंदाजे असून, अचूक तारीख अधिकृत वेबसाइटवर प्रदर्शित केली जाईल)

भरतीसाठी आवशयक परीक्षेविषयी :

इंडियन टेरिटोरियल आर्मीच्या Territorial Army Officers पदासाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांची निवड परीक्षा आणि नंतर मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

सदर परीक्षा ही CBT (Computer Based Test) असणार आहे.

सदर भरतीसाठी अर्ज करणार्‍या उमेदवाराची एकूण १०० गुणांची परीक्षा होणार असून, ही परीक्षा २ तासांची असणार आहे.

Reasoning, Elementary Mathematics, General Knowledge आणि English अशा चार विभागांमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

परीक्षेसंदर्भातील अधिक महितीसाठी आणि मार्किंग सिस्टिमविषयी अधिक महितीसाठी मूळ जाहिरात वाचा (मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

महत्त्वाच्या लिंक्स :

इंडियन टेरिटोरियल आर्मी भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

इंडियन टेरिटोरियल आर्मी भरतीमधील जागांसाठी अर्ज करण्यासाठी आणि अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

(वाचा : Jalsampada Vibhag 2023: सातार्‍याच्या जलसंपदा विभागात भरतीची; थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार निवड)

Source link

join territorial armyas an officerterritorial army bharti 2023territorial army job vacancyterritorial army recruitment 2023vacancies open for territorial army officerआर्मी भरतीइंडियन आर्मी भरतीइंडियन टेरिटोरियल आर्मी (भारतीय प्रादेशिक सेना)टेरीटोरियल आर्मी भरती
Comments (0)
Add Comment