नुकतीच याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यत आली असून इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून ३० नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा पदे, पदसंख्या, पात्रता, अर्ज प्रक्रिया यासह सविस्तर माहिती पाहूया.
‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
वरिष्ठ चाचणी पायलट/चाचणी पायलट – ०२ जागा
मुख्य व्यवस्थापक – ०१ जागा
वरिष्ठ व्यवस्थापक – ०१ जागा
उपव्यवस्थापक – ४४ जागा
व्यवस्थापक – ०५ जागा
वित्त अधिकारी – ०६ जागा
सुरक्षा अधिकारी – ०९ जागा
अधिकारी – ०१ जागा
अभियंता – १२ जागा
अग्निशमन अधिकारी – ०३ जागा
एकूण रिक्त पद संख्या – ८४ जागा
(वाचा: Study Tips: विद्यार्थ्यांनो मोठी उत्तरे लक्षात ठेवणे कठीण जातय? मग पाठांतराच्या ‘या’ सोप्या टिप्स नक्की वाचा)
शैक्षणिक पात्रता: संबधित क्षेत्रातील पदवी/ पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पात्रता प्रत्येक पदाच्या आवश्यकतेनुसार भिन्न असून अधिसूचनेमध्ये सविस्तर पात्रता दिलेली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली नमूद केली आहे.
अर्ज पद्धती: ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, कॉर्पोरेट कार्यालय, १५/१, कब्बन रोड, बेंगळुरू ५६०००१
अर्ज शुल्क: या भरतीकरिता ५०० रुपये अर्ज शुल्क आहे. राखीव प्रवर्गाला शुल्क माफ आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० नोव्हेंबर २०२३
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरतीसंदर्भात अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जासह आवश्यक ती कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजे ३० नोव्हेंबर २०२३ च्या आधी संबंधित पत्त्यावर पोहोचणे गरजेचे आहे. उशिरा आलेले किंवा अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
(वाचा: Work Management Tips: ऑफिसच्या कामांचे उत्तम नियोजन करण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा)