एकूण 0८ रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार असून त्यासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे असून २५ नोव्हेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता आणि सविस्तर माहिती पाहूया.
‘माहिती व प्रसारण मंत्रालय भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
कर्मचारी कार चालक – ०८ जागा
एकूण रिक्त पदसंख्या: ०८ जागा
शैक्षणिक पात्रता: उमेदवार दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा. त्याच्याकडे स्वतःचा अधिकृत वाहन परवाना हवा. तसेच गाडीमधील तांत्रिक गोंष्टीची त्याला साधारण माहिती हवी. वाहन चालक म्हणून ०३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
(वाचा: Career In Anchoring: ‘निवेदक’ म्हणून करता येईल करिअर; या गोष्टी आजच आत्मसात करा)
वयोमर्यादा: ५६ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
अर्ज पद्धती: ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: श्रीमती कीर्ती गुप्ता, अवर सचिव (प्रशासन), कक्ष क्रमांक ५४४, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, ए-विंग, शास्त्री भवन, नवी दिल्ली ११०००१.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: २५ नोव्हेंबर २०२३
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘माहिती व प्रसारण मंत्रालय’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरतीसंदर्भात अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जासह आवश्यक ती कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजे २५ नोव्हेंबर २०२३ च्या आधी संबंधित पत्त्यावर पोहोचणे गरजेचे आहे. उशिरा आलेले किंवा अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
(वाचा: Work Management Tips: ऑफिसच्या कामांचे उत्तम नियोजन करण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा)