या भरती अंतर्गत ‘कार्यकारी’ पदाच्या एकूण ५० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. अभियांत्रिकी पदवीधरांसाठी ही सुवर्णसंधी असून या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून १० नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरती प्रक्रियेतील पदे, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याची सविस्तर माहिती पाहूया.
(फोटो सौजन्य -नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन यांचे संकेतस्थळ)
‘नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
(Exixutive) कार्यकारी – ५० जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ५० जागा
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षणसंस्थेतून संबधित विषयातील अभियांत्रिकी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ( BE/ B.Tech in EEE/ ECE/ Mechanical/ Instrumentation Engineering from any of the recognized boards or Universities)
(वाचा: MIB Recruitment 2023: माहिती व प्रसारण मंत्रालयात १० वी पास उमेदवारांसाठी भरती; ही संधी सोडू नका)
वयोमर्यादा: कमाल ३५ वर्षे (राखीव प्रवर्गाला सवलत देण्यात आली आहे)
अर्ज पद्धती: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० नोव्हेंबर २०२३
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरतीसंदर्भात अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरतीकरिता थेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज भरण्याआधी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे. अर्जासह आवश्यक ती कागदपत्रे आणि तपशील जोडणे अनिवार्य आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजे १० नोव्हेंबर २०२३ च्या आधी सादर करावा.. उशिरा आलेले किंवा अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
(वाचा: Work Management Tips: ऑफिसच्या कामांचे उत्तम नियोजन करण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा)