‘एमपीएससी’ अंतर्गत पदवीधरांसाठी भरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

‘एमपीएससी’ द्वारे होणार्‍या भरतीची सगळेच वाट बघत असतात. नुकतीच ‘एमपीएससी’ म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नव्या भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मराठी भाषा विभाग, महसूल आणि वन विभाग आदी विभागांमध्ये विविध संवर्गातील ३२ पदे भरण्यात येणार आहेत.

यामध्ये प्राचार्य/संचालक, अनुवादक मराठी आणि अनुवादक हिंदी, सहाय्यक वन सांख्यिकी या पदांच्या एकूण ३२ रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून २० नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
प्राचार्य/संचालक – १८ जागा
अनुवादक मराठी (गट-क) – ०४ जागा
अनुवादक हिंदी (गट-क) – ०३ जागा
सहाय्यक वन सांख्यिकी (गट-ब) – ०७ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ३२ जागा

(वाच: NTPC Recruitment 2023: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये मोठी भरती; आजच करा अर्ज)

पात्रता:
प्राचार्य/संचालक – संबधित विषयात पी. एचडी. आणि अध्यापन आणि संशोधनाचा पंधरा वर्षांचा अनुभव.
अनुवादक मराठी गट-क – मराठी भाषेतील पदवी
अनुवादक हिंदी गट-क – हिंदी भाषेतील पदवी
सहाय्यक वन सांख्यिकी गट-ब – पुढील विषयात पदव्युत्तर पदवी ( Statistics, Mathematics, Economics, Commerce)

वेतन:
प्राचार्य/संचालक – १ लाख ४४ हजार २०० ते २ लाख १८ हजार २००
अनुवादक मराठी (गट-क) – ३५ हजार ४०० ते १ लाख १२ हजार ४००
अनुवादक हिंदी (गट-क) – ३५ हजार ४०० ते १ लाख १२ हजार ४००
सहाय्यक वन सांख्यिकी (गट-ब) – ४१ हजार ८०० ते १ लाख ३२ हजार ३००

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख: ३० ऑक्टोबर २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० नोव्हेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरतीमधील संदर्भात ‘प्राचार्य/संचालक’ या पदाची अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरतीमधील संदर्भात ‘अनुवादक मराठी/ हिंदी’ या पदाची अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरतीमधील संदर्भात ‘सहाय्यक वन सांख्यिकी’ या पदाची अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(वाचा: Work Management Tips: ऑफिसच्या कामांचे उत्तम नियोजन करण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा)

Source link

Maharashtra Public Service Commission jobsMPSC Bharti 2023mpsc jobs 2023MPSC Recruitment 2023एमपीएससी भरतीमहाराष्ट्र लोकसेवा आयोग
Comments (0)
Add Comment