महाराष्ट्र मेट्रोमध्ये अप्रेंटीस पदासाठी मोठी भरती; आजच करा अर्ज

Maharashtra Metro Rail Corporation Recruitment 2023: दहावी उत्तीर्ण आयटीआय उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. राज्यात विस्तारत चाललेल्या मेट्रो सेवेमध्ये नोकरीची संधी चालून आली आहे. महा-मेट्रो म्हणजेच महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड येथे भरती सुरू आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत अप्रेंटीस/ प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण १३४ जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच याबाबत महा- मेट्रोने अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे.

या पदांकरिता इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ नोव्हेंबर २०२३ ही आहे. तेव्हा भरती प्रक्रियेतील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज कसा करावा याची सविस्तर माहिती पाहूया.

(फोटो सौजन्य: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड)

‘महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड प्रशिक्षणार्थी भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
नागपूर – ७१ जागा
पुणे – ५३ जागा
नवी मुंबई – १० जागा
एकूण पदसंख्या – १३४ जागा

(वाचा: Career In Science Stream: विज्ञान शाखेतील PCB आणि PCM म्हणजे काय? जाणून घ्या त्यातील करिअरच्या संधी)

पात्रता: मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी किंवा बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच ‘आयटीआय’ अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वेतन/ स्टायपेंड: ८ हजार ५० रुपये (मासिक)

नोकरी ठिकाण: नागपूर, पुणे आणि नवी मुंबई

वयोमर्यादा: किमान १७ वर्षे ते कमाल २४ वर्षे

अर्ज शुल्क: खुल्या प्रवर्गासाठी १०० रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी शुल्क नाही मात्र त्यांना ५० रुपये प्रक्रिया शुल्क भरावे लागेल.

अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २८ नोव्हेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘महाराष्ट्र मेंट्रो रेल कॉर्पोरेशन’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात सविस्तर अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरतीकरिता थेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी २८ नोव्हेंबर २०२३ च्या आधी सादर करणे आवश्यक आहे. तसेच अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक ती सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडावी. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: Work Management Tips: ऑफिसच्या कामांचे उत्तम नियोजन करण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा)

Source link

Maha Metro Recruitment 2023nagpur metro recruitment 2023navi mumbai metro recruitment 2023pune metro recruitment 2023अप्रेंटीस भरतीमहा मेट्रो रेल भरतीमहाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन भरती
Comments (0)
Add Comment