How to Make a Strong Resume: नोकरीसाठी अर्ज करताना सादर करावे लागणारे स्वत:च्या कार्यानुभवाचे, शिक्षणाचे परिचयपत्र म्हणजेच रेझ्युमे किंवा ‘बायो-डेटा’. आपल्या रेझ्युमेतून आपलं व्यक्तिमत्त्व, आपली आजवरची कामगिरी यांचे प्रतिबिंब असतो. उत्तम रेझ्युमे हा नोकरीसाठी तुमची प्राथमिक ओळख करून देणारे माध्यम ठरते. त्यामुळे, उत्तम रेझ्यमे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या व्यक्तिमत्त्वाची पहिली छाप सोडण्यासाठी महत्त्वाच ठरतो. त्यामुळे तुमचा Job Resume उत्तम असणे अत्यंत गरजेचे ठरते.
रेझ्युमे जर प्रभावशाली नसेल किंवा तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल पुरेशी माहिती देणारा नसेल, तर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलावले जाण्याची शक्यता कमी होते. कदाचित तुमची शैक्षणिक पात्रता व कामाचा अनुभव हा त्या पदासाठी योग्य असेल. परंतु रेझ्युमे चांगला नसल्यामुळे तुम्ही संधी गमावूही शकता. म्हणूनच हा इतका महत्त्वाचा असणारा रेझ्युमे तयार करताना काय काळजी घ्याल याची माहिती खास तुमच्यासाठी…
Source link