पुण्यातील ‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’ येथे विविध पदांची भरती; आजच करा अर्ज

Maharashtra Education Society Pune Recruitment 2023: तुम्ही पदवीधर आहात आणि नोकरीच्या शोधात असाल तर पुण्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे सीएसआर समन्वयक, प्लेसमेंट अधिकारी, सुविधा अधिकारी, सहाय्यक सुविधा अधिकारी या पदांच्या एकूण ०५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’ यांनी नुकतीच याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली असून इछुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच ई-मेल द्वारे अर्ज करायचा असून ०४ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची आहे. तेव्हा या भरती प्रक्रियेतील पदे, पदसंख्या, पात्रता आणि सविस्तर माहिती पाहूया.
(फोटो सौजन्य: महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी)

‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
सीएसआर समन्वयक – ०१ जागा
प्लेसमेंट अधिकारी – ०१ जागा
सुविधा अधिकारी – ०२ जागा
सहाय्यक सुविधा अधिकारी – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०५ जागा

पात्रता:
सीएसआर समन्वयक – संबधित विषयात पदव्युत्त पदवी आणि ०५ वर्षांचा अनुभव
प्लेसमेंट अधिकारी – संबधित विषयात पदव्युत्त पदवी आणि ०५ वर्षांचा अनुभव
सुविधा अधिकारी – संबधित विषयात पदवी आणि ०५ वर्षांचा अनुभव
सहाय्यक सुविधा अधिकारी – संबधित विषयात पदवी आणि ०२ वर्षांचा अनुभव

(वाचा: Postal Life Insurance Bharti 2023: दहावी पास उमेदवारांसाठी टपाल जीवन विमा, मुंबई येथे कमिशन तत्वावर नोकरी)

वयोमर्यादा:
सीएसआर समन्वयक – किमान ३५ ते कमाल ५० वर्षे
प्लेसमेंट अधिकारी – किमान ३० ते कमाल ३५ वर्षे
सुविधा अधिकारी – किमान ३५ ते कमाल ४५ वर्षे / ५० वर्षे (विभागवार)
सहाय्यक सुविधा अधिकारी – किमान २५ ते कमाल ३० वर्षे

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती: ऑनलाईन ई-मेल द्वारे

निवड प्रक्रिया: मुलाखती द्वारे

अर्ज करण्यासाठी ई-मेल पत्ता: jobs@mespune.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०४ नोव्हेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात सविस्तर अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ई-मेल पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच ०४ नोव्हेंबर २०२३ च्या आधी सादर करणे आवश्यक आहे. तसेच अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक ती सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडावी. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: Career Opportunities in Foreign Language: परदेशात मोठ्या पगारची नोकरी हवीय, तर ‘या’ भाषा जरूर शिका)

Source link

job for graduatesMaharashtra Education Society jobsMaharashtra Education Society Recruitment 2023Pune Jobs 2023पुणे भरतीमहाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी भरती
Comments (0)
Add Comment