नुकतीच याबाबत सेंट्रल रेल्वेने अधिसूचना जाहीर केली आहे. यामध्ये विविध विभागातील स्पेशॅलिस्ट समाविष्ट आहेत. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून ३० नोव्हेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरती प्रक्रियेतील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन अर्ज प्रक्रिया याची सविस्तर माहिती घेऊया.
‘सेंट्रल रेल्वे सोलापूर विभाग भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
व्हिजिटिंग स्पेशॅलिस्ट/ रेल्वे हॉस्पिटल, सोलापूर
अस्थिरोगतज्ज्ञ/ Orthopedician – ०१
रेडिओलॉजिस्ट – ०१
शल्य चिकित्सक/ Surgeon – ०१
नेत्ररोग तज्ज्ञ/ Ophthalmologist – ०१
फिजिशियन – ०१
व्हिजिटिंग स्पेशॅलिस्ट/ रेल्वे हॉस्पिटल, कुर्डूवाडी
शल्य चिकित्सक/ Surgeon – ०१
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ/Obstetrician & Gynecologists: ०१
फिजिशियन – ०१
व्हिजिटिंग स्पेशॅलिस्ट/ रेल्वे हॉस्पिटल, कुर्डूवाडी
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ: ०१
फिजिशियन – ०१
एकूण रिक्त पदसंख्या: ०९
(वाचा: Work Management Tips: ऑफिसच्या कामांचे उत्तम नियोजन करण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा)
पात्रता:
मान्यताप्राप्त विद्यापीठातून/ शिक्षण संस्थेतून संबधित विषयातील पदव्युत्तर पदवी आणि संबंधित स्पेशालिटीशी ३ वर्षांचा कामाचा अनुभव.
मान्यताप्राप्त विद्यापीठातून/ शिक्षण संस्थेतून संबधित विषयातील डिप्लोमा/पदवी आणि संबंधित स्पेशालिटीशी ५ वर्षांचा कामाचा अनुभव.
नोकरी ठिकाण: सोलापूर/ कुर्डूवाडी/ दौंड
वयोमर्यादा: किमान ३० वर्षे तर कमाल ६५ वर्षे
वेतन: ५२ हजार प्रति महिना
अर्ज पद्धती: ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: मुख्य वैद्यकीय अधीक्षक, विभागीय रेल्वे रुग्णालय, सोलापूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० नोव्हेंबर २०२३ (सकाळी ११ पर्यंत)
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘सेंट्रल रेल्वे’ च्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात सविस्तर अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच ३० नोव्हेंबर २०२३ च्या आधी सादर करणे आवश्यक आहे. तसेच अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक ती सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडावी. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
(वाचा: Career Opportunities in Foreign Language: परदेशात मोठ्या पगारची नोकरी हवीय, तर ‘या’ भाषा जरूर शिका)