पॉवरग्रिड कॉर्पोरेशनमध्ये ‘एलएलबी’ उमेदवारांसाठी नोकरीची संधी; जाणून घ्या सर्व तपशील

Power Grid Corporation of India Limited Recruitment 2023: ‘पीजीसीआयएल’ म्हणजेच म्हणजेच पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे भरती सुरू आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत कायदा विषयक ऑफिसर ट्रेनी पदाच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच याबाबत ‘पीजीसीआयएल’ने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

कायद्याचे शिक्षण घेतलेल्या म्हणजेच ‘ एलएलबी’ उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून २९ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता, वेतन, वयोमर्यादा यासह सविस्तर माहिती पाहूया.

‘पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
कायदा विषयक अधिकारी प्रशिक्षणार्थी (Ofiicer Trainee law ) – १० जागा
एकूण रिक्त पदसंख्या – १० जागा

पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षण संस्थेतून पूर्णवेळ तीन किंवा पाच वर्षांच ‘एलएलबी’ अभ्यासक्रम ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

(वाचा: Career Opportunities in Foreign Language: परदेशात मोठ्या पगारची नोकरी हवीय, तर ‘या’ भाषा जरूर शिका)

वयोमर्यादा: कमाल वय २८ वर्षे असून कमाल वयोमर्यादेत ओबीसी प्रवर्गाला ३ वर्षांची तर एससी/एसटी प्रवर्गाला ५ वर्षांची सवलत आहे.

अर्ज शुल्क: या भरती करिता ५०० रुपये अर्जशुल्क आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क माफ आहे.

अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख: ०९ नोव्हेंबर २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २९ नोव्हेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’ च्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात सविस्तर अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया ०९ नोव्हेंबर २०२३ पासून सुरू होणार असून अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच २९ नोव्हेंबर २०२३ च्या आधी सादर करणे आवश्यक आहे. तसेच अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक ती सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडावी. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: Work Management Tips: ऑफिसच्या कामांचे उत्तम नियोजन करण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा)

Source link

job for llb studentsPGCIL bharti 2023PGCIL Recruitment 2023Powergrid Corporation of india jobs 2023ऑफिसर ट्रेनी भरतीपॉवरग्रिड कॉर्पोरेशन भरती २०२३
Comments (0)
Add Comment