पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अप्रेंटीस पदासाठी महाभरती; ३०० हून अधिक जागांसाठी आजच करा अर्ज

Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2023: तुम्ही ‘आयटीआय’ अभ्यासक्रम उत्तीर्ण आहात आणि अप्रेंटीससाठी उत्तम संधी शोधत असाल तर तुमच्यासाठी पुण्यामध्ये एक खास भरती सुरू आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत महाभरती राबणव्यात आली असून या भरतीद्वारे विविध ट्रेड मधील ‘अप्रेंटीस’ पदाच्या एकूण ३०३ रिक्त जागा भरण्यात येणार आहे. नुकतीच महानगरपालिकेने याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून ०७ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता, पदसंख्या, वेतन याबाबत सविस्तर माहिती पाहूया.

‘पिंपरी चिंचवड महानगरपालिका अप्रेंटीस भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
कोपा – १०० जागा
वीजतंत्री – ५९ जागा
तारतंत्री – ४६ जागा
रेफ्रिजरेशन आणि वातानुकुलन मेकॅनिक – २६ जागा
नळ कारागीर – २४ जागा
डेक्सटॉप ऑपरेटिंग – १६ जागा
पंप ऑपरेटर कम मेकॅनिक – १२ जागा
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – १० जागा
आरेखक स्थापत्य – ४ जागा
भूमापक – ४ जागा
मेकॅनिक मोटर व्हेईकल – २ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ३०३ जागा

(वाचा: Career Opportunities in Foreign Language: परदेशात मोठ्या पगारची नोकरी हवीय, तर ‘या’ भाषा जरूर शिका)

शैक्षणिक पात्रता: संबधित ट्रेड मधील आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वेतन/ स्टायपेंड: ७ हजार ७०० ते ८ हजार ५० रुपये (मासिक)

अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०७ नोव्हेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘पिंपरी चिंचवड महानगरपालिका’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात सविस्तर अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजे ०७ नोव्हेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. तसेच अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक ती सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडावी. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: Work Management Tips: ऑफिसच्या कामांचे उत्तम नियोजन करण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा)

Source link

PCMC Bharti 2023PCMC recruitment 2023Pimpri Chinchwad Municipal Corporation jobsअप्रेंटीस भरतीपिंपरी-चिंचवड महानगरपालिकापिंपरी-चिंचवड महापालिका
Comments (0)
Add Comment