CBSE बोर्डाने जाहीर केले २०२४ च्या दहावी-बारावी प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक, ‘या’ तारखेपासून Practical Exams ला सुरुवात

CBSE Exam Timetable 2024: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSE ने नुकतीच एक अधिकृत घोषणा केली आहे. त्यानुसार, इयत्ता १० वी आणि १२ वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा १ जानेवारी २०२४ पासून सुरू होणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे ते बोर्डाची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर किंवा त्यांच्या वैयक्तिक संस्थांद्वारे प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक मिळवू शकणार आहेत. CBSE च्या मुख्य लेखी परीक्षेपूर्वी प्रात्यक्षिक परीक्षा पार पडते. लवकरच सीबीएसईच्या लेखी परीक्षांचेही वेळापत्रकही जाहीर होणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

CBSE दहावी-बारावी परीक्षेत बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून त्यांची कोणतीही महत्त्वाची माहिती चुकणार नाही. मागीलवर्षी मंडळाने २९ डिसेंबर रोजी वेळापत्रक जाहीर केले होते. अशा स्थितीत यंदाही मंडळाकडून या तारखेच्या आसपास परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे. अधिकृत संकेतस्थळाव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांना संबंधित शाळांकडून ही माहिती मिळू शकेल.

यापूर्वी, बोर्डाने सीबीएसई २०२४ च्या दोन्ही वर्गांच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याचे जाहीर केले होते. यंदाच्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करताना बोर्डाने ही माहिती दिली. याशिवाय, बोर्डाने या परीक्षा सुमारे ५५ दिवस आयोजित केले जाणार असल्याचे जाहीर केले आहे.

(वाचा : Board Exams 2024: दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर; २०२४ मध्ये या दिवसांमध्ये पार पडणार बोर्डाच्या परीक्षा)

CBSE १० वी-१२ वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी :

– सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
– यानंतर दहावी-बारावी डेटशीट लिंकवर क्लिक करा.
– आता वर्ग (दहावी अथवा बारावी) निवडा.
– यानंतर PDF फाईल डाउनलोड करा.
– आता ते डाउनलोड करा आणि आपल्याजवळ ठेवा.

Source link

cbsecbse board examcbse exam 2024CBSE Exam Timetable 2024cbse latest newsCBSE Practical Examspractical examsसीबीएसईसीबीएसई परीक्षा २०२४
Comments (0)
Add Comment