सदर पोलीस पाटील भरतीसाठीचे विहित नमुन्यातील अर्ज संबंधित गावाचे तहसिलदार कार्यालयामध्ये विक्रीसाठी उपलब्ध असून उमेदवारांना २५ रुपये अर्ज शुल्क भरून अर्ज घेता येणार आहे. सदर भरतीसाठीचे हे अर्ज संबंधित गावाच्या तहसिलदार कार्यालयात अर्जसोबत लागू असणारी सर्व कागदपत्रे जोडून उमेदवाराने स्वतः उपस्थित राहून सादर करायचे आहे. पोस्ट, ई-मेल अथवा इतर कोंत्यहई मार्गानी येणार्या कोणत्याही अर्जाचा या भारतीसाठी विचार केला जाणार नाही. त्याचप्रमाणे तहसिलदार कार्यालयामार्फत वितरित केलेले मूळ अर्ज्च स्विकारले जातील. अर्जाची झेरॉक्स (छायांकित प्रत) स्वीकारली जाणार नाही.
पदभरतीचा तपशील :
विभाग : उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, तालुका कणकवली, वैभववादी आणि देवगड
भरले जाणारे पद : पोलीस पाटील
एकूण रिक्त जागा : १३४ जागा
तालुका निहाय पोलीस पाटील पदाच्या जागा :
तहसिलदार कार्यालय कणकवली : ५२ जागा
तहसिलदार कार्यालय वैभववाडी : ३७ जागा
तहसिलदार कार्यालय देवगड : ४५ जागा
(वाचा : CISF Recruitment 2023: सीआयएसएफमध्ये हेड कॉन्स्टेबल पदासाठी भरती, अशा प्रकारे अर्ज करा)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन (अर्ज जमा करण्यासाठी उमेदवाराने स्वतः उपस्थित असणे आवश्यक)
अर्ज विक्री व स्विकारण्याचा पत्ता : तहसिलदार कार्यालय कणकवली / वैभववाडी / देवगड
नोकरीचे ठिकाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली / वैभववाडी / देवगड
महत्वाच्या तारखा :
अर्ज करण्याला सुरुवात : ०१ नोव्हेंबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०९ नोव्हेंबर २०२३
(महत्त्वाचे : अर्ज विक्री आणि स्वीकारण्याचा कालावधी ०१ ते ०९ नोव्हेंबर २०२३ या कलावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६.१५ या वेळेत)
अर्ज आणि परीक्षा शुल्काविषयी :
पोलीस पाटील भरती करीता अर्ज शुल्क व परीक्षा शुल्क खलील प्रमाणे असेल. तसेच, अर्जावर ५ रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प चिकटविणे आवश्यक आहे.
अर्ज शुल्क २५ रुपये
परीक्षा शुल्क :
1. खुल्या प्रवर्गाकरीता उमेदवारांसाठी : ४०० रुपये
2. मागास प्रवर्गाकरीता : ३०० रुपये
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
उमेदवार १० वी पास असणे आवश्यक आहे. (अधिक महितीसाठी मूल जाहिरात वाचा)
असा करा अर्ज :
1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवाराने संबंधित तहसिलदार कार्यालयात स्वतः उपस्थित राहुन अर्ज सादर करावा.
3. इतर कोणत्याही प्रकारे / माध्यमाव्दारे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.
4. उमेदवारांनी अर्जात नोंदविलेला ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक चुकीचा/अपूर्ण असल्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रियेदरम्यान पाठविल्या जाणा-या सूचना, संदेश व माहिती उमेदवारांना प्राप्त न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील.
5. तसेच ई-मेल आयडी व मोबाईल संदेश वहनात येणा-या तांत्रिक अडचणींना उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, कणकवली हे जबाबदार असणार नाही.
पोलीस पाटील पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता, परीक्षेचे स्वरूप, ओएमआर, निवड कार्यपद्धती, अटी व शर्ती, आरक्षण या विषयी पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचा.
अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
(वाचा : Jalsampada Vibhag 2023: सातार्याच्या जलसंपदा विभागात भरतीची; थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार निवड)