‘महाराष्ट्र रेरा’ मध्ये १२वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी; आजच करा अर्ज

Maharashtra Real Estate Regulatory Authority Peon Bharati 2023: राज्यातील गृहनिर्माण क्षेत्रातील लाभार्थी, प्रवर्तक व अभिकर्ता इत्यादींच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘महा रेरा’ म्हणजेच ‘महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण’ याच्या अंतर्गत भरती सुरू आहे. राज्य सरकारच्या अंतर्गत येणार्‍या या प्राधिकरणात शिपाई पदांच्या एकूण ०९ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

त्यामुळे बारावी पास उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. या भरती करिता इच्छुक आणि पात्र असणार्‍या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून ०९ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरती मधील पदे, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
शिपाई – ०९ जागा
पद संख्या – ०९ जागा

शैक्षणिक पात्रता: उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

(वाचा: UGC News: उच्च शिक्षण संस्थांसाठी ‘यूजीसी’चा मोठा निर्णय; शुल्क, सुविधा यासह सर्व माहिती संकेतस्थळावर देणे बंधनकारक)

नोकरी ठिकाण: मुंबई

वेतन: २५ हजार (मासिक)

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण, पहिला मजला, वन फोर्ब्स बिल्डिंग, थापर हाऊस, डॉ. व्ही. बी. गांधी रोड, काळा घोडा, फोर्ट, मुंबई ४००००१.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०९ नोव्हेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात सविस्तर अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजे ०९ नोव्हेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. तसेच अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक ती सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडावी. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: Tips for English Learning: इंग्रजी समजतं पण लिहिता बोलता येत नाही? मग या ५ टिप्स जरूर वाचा)

Source link

Maha RERA Bharati 2023Maha RERA Recruitment 2023Maharashtra Real Estate Regulatory Authority jobsमहा रेरा भरती २०२३महाराष्ट्र रेरा भरती २०२३महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण नोकरी
Comments (0)
Add Comment