५ नोव्हेंबरपासून होणार जेईई परीक्षेची अर्ज नोंदणी प्रक्रिया? हे असेल संभाव्य वेळापत्रक

JEE Main 2024: जेईई मुख्य परीक्षा दरवर्षी घेतली जाते. या परीक्षेला मोठ्या संख्येने उमेदवार बसतात. जेईई मेन परीक्षेत टॉप २.५ लाख रँक असलेल्या उमेदवारांना JEE Advanced परीक्षेसाठी बोलावले जाते. यात यशस्वी झालेल्यांना आयआयटी, एनआयटीसह इयर प्रथितयश संस्थामध्ये प्रवेश दिला जातो.

जेईई मेनमध्ये यशस्वी झालेले उमेदवार एनआयटी, ट्रिपलआयटी, डीम्ड आणि इतर केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी पात्र ठरतात. तसेच, या स्कोअरच्या आधारे, अनेक राज्यांमध्ये त्यांच्या बी.टेक अभ्यासक्रमांना प्रवेश देखील देतात. २०२४ च्या परीक्षेसाठी नोंदणी अधिकृत वेबसाइटवर ५ नोव्हेंबरपासून सुरू होऊ शकते. तथापि, नोंदणी सुरू करण्याच्या तारखा एनटीएने अद्याप जाहीर केलेल्या नाहीत.

(वाचा : National Testing Agency ने जाहीर केले २०२४ मधील परीक्षांचे वेळापत्रक, यादिवशी होणार CUET, NEET, JEE आणि UGC परीक्षा)

मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर येत्या ५ नोव्हेंबरपासून नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. त्यानंतर इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्जाची पायरी अधिकृत वेबसाइटवर दिली जाईल. मात्र, अधिकृत अपडेट्स मिळवण्यासाठी उमेदवारांना संकेतस्थळावर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

JEE Main 2024 साठी असा करा अर्ज :

– सर्व प्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
– यानंतर तुम्हाला JEE Main 2024 नोंदणी लिंकवर क्लिक करावे लागेल.
– आता तुम्हाला यूजर आयडी आणि पासवर्ड तयार करावा लागेल.
– जेईई मेन 2024 फॉर्म भरावा लागेल.
– संबंधित कागदपत्रे अपलोड करा.
– यानंतर, फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.
– आता फी भरा.
– यानंतर, फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.

(वाचा : JEE Main 2024: जेईई मेन २०२४ साठी अर्ज प्रक्रिया केव्हा सुरू होणार? परीक्षेची तारीख आणि इतर तपशील जाणून घ्या)

Source link

JEE 2024 Time TableJEE Exam ScheduleJEE Mainjee main 2024joint entrance examजेईई मेन परीक्षा
Comments (0)
Add Comment