विद्यार्थिहो तयारीला लागा…! महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवसापासून परीक्षांना सुरुवात

SSC and HSC Exam Schedule 2024: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (राज्य मंडळ) दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे हे अंतिम वेळापत्रक असून, बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या वेबसाइटवर आज, गुरुवार १ नोव्हेंबर २०२३ पासून पाहता येणार आहे, अशी माहिती मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.

राज्य मंडळाने काही दिवसांपूर्वी १० वी आणि १२ वीच्या परीक्षांबाबत संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले होते. या वेळापत्रकाबाबत सूचना किंवा हरकती नोंदविण्यासाठी मंडळाने पंधरा दिवसांची मुदत दिली होती. त्यानुसार, बोर्डाच्यावतीने आता अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

२०२४ मध्ये बारावीची (सर्वसाधारण, द्विलक्ष्यी आणि व्यवसाय अभ्यासक्रम) परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत पार पडणार आहे. त्याचप्रमाणे, बारावीच्या माहिती तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाइन परीक्षा २० ते २३ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहे.

(वाचा : CBSE बोर्डाने जाहीर केले २०२४ च्या दहावी-बारावी प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक, ‘या’ तारखेपासून Practical Exams ला सुरुवात)

तर, एसएससी बोर्ड परीक्षा १ ते २६ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहे. विद्यार्थ्यांना दिनांकनिहाय परीक्षेचे वेळापत्रक बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहे.

दहावीची श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत परीक्षा १० ते २९ फेब्रुवारी या कालावधीत होईल. तर, बारावीची श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाची परीक्षा २ ते २० फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.

मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रक हे अंतिम असून, सर्व माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना हे वेळापत्रक देण्यात आले आहे. मंडळाकडून देण्यात आलेल्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी,अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. शिवाय, इतर संकेतस्थळ, अन्य यंत्रणांवरील छापील वेळापत्रक किंवा व्हॉट्स अ‍ॅपच्या Whatsapp च्या माध्यमातून व्हायरल होणारे वेळापत्रक ग्राही धरू नये अशा सूचनाही राज्य शिक्षण मंडळाच्यावतीच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

अधिक महितीसाठी www.mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

(वाचा: JEE Main 2024: जेईई मेन २०२४ साठी अर्ज प्रक्रिया केव्हा सुरू होणार? परीक्षेची तारीख आणि इतर तपशील जाणून घ्या)

Source link

board exams 2024Board exams 2024 Datesbordachi parikshaHSC Exam timetablemahahsscboard.inSSC Examबोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रकमहाराष्ट्र बोर्ड दहावी बारावी वेळापत्रक
Comments (0)
Add Comment