नारायण राणेंच्या अटकेआधी पडद्यामागं नेमकं काय घडलं? जाणून घ्या सर्व माहिती

मुंबईः केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मंगळवारी त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. या अटकनाट्यानंतर पडद्यामागच्या बऱ्याच घडामोडी आता समोर येत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर झालेल्या कारवाईची आखणी सोमवारी रात्रीच करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.

नारायण राणेंच्या अटकेसाठी परिवहन मंत्री अनिल परब हे पोलिसांच्या संपर्कात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. रत्नागिरीचे पालकमंत्री असलेले अनिल परब यांनी मंगळवारी नारायण राणेंच्या अटकेचे आदेश दिले असल्याचं एका वृत्त वाहिनींनी म्हटलं होतं. त्यामुळं नारायण राणेंच्या कारवाईसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आधीच खल झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आता शिवसेना आमदाराची राणेंविरोधात प्रक्षोभक भाषा; कारवाईकडं लक्ष

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राणेंविरोधात कारवाई करण्यासाठी शिवसेनेचे नेते आग्रही होते. त्यानुसार महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा झाल्यानंतर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्षा बंगल्यावर कारवाई कशी व कधी करायची याची आखणी करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संमतीनंतरच अटकेची कारवाई करण्यात आली असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.

नारायण राणे यांना अटक करण्यासंदर्भात शरद पवार यांनाही माहिती देण्यात आली होती. शरद पवारांच्या परवानगीनंतरच या कारवाईला सुरुवात झाली. त्यानुसार मंगळवारी सकाळीच पोलिसांना कारवाईसाठी मोकळीक देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

‘नारायण राणे हे महान किंवा कर्तबगार कधीच नव्हते’

राणेंना अटक व जामीन

नारायण राणे यांना मंगळवारी रत्नागिरी पोलिसांनी संगमेश्वर येथून अटक केली. त्यानंतर रायगड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलेल्या राणे यांना महाडला नेण्यात आले. नारायण राणे यांना महाडला नेऊन पोलिसांनी न्यायालयात हजर केले. यावेळी त्यांच्या पत्नी नीलम राणे या देखील न्यायालयात उपस्थित होत्या. नारायण राणे जबाबदार व्यक्ती असताना बेजबाबदारीने वागले, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला, तर राणे यांच्यावर पोलिसांनी लावलेली कलमे चुकीची आहेत. पोलिस तपासासाठी दिलेली कारणे योग्य नाहीत. राणे यांना अटक करण्यापूर्वी पोलिसांनी कोणतीही लेखी नोटीस दिलेली नाही, असा युक्तिवाद राणे यांच्या वकिलांनी केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यावर राणे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला.

हिशेब चुकता करण्याचे भाजपचे संकेत; अनिल परबांना करणार लक्ष्य?

Source link

Narayan Ranenarayan rane casenarayan rane news updatenarayan rane statementनारायण राणे
Comments (0)
Add Comment