जलसंपदा विभागात ४ हजार ४९७ पदांची महाभरती, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

WRD Jalsampada Vibhag Bharti 2023: महाराष्ट्र राज्य सरकार मध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. राज्याच्या जलसंपदा विभागा अंतर्गत १४ संवर्गातील ४ हजार ४९७ पदे भरली जाणार आहेत. यामध्ये वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, निम्नश्रेणी लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक, आरेखक ही अशी अनेक पदे समाविष्ट आहेत. नुकतीच याबाबत राज्य शासनाने अधिसूचना जाहीर केली आहे.

या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असणार्‍या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून ०३ नोव्हेंबर २०२३ पासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार तर २४ नोव्हेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘जलसंपदा विभाग भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब – ०४ जागा
निम्नश्रेणी लघुलेखक – १९ जागा
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक – १४ जागा
भूवैज्ञानिक सहाय्यक – ०५ जागा
आरेखक – २५ जागा
सहाय्यक आरेखक – ६० जागा
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – १५२८ जागा
प्रयोगशाळा सहाय्यक – ३५ जागा
अनुरेखक – २८४ जागा
दप्तर कारकुन – ४३० जागा
मोजणीदार – ७५८ जागा
कालवा निरीक्षक – ११८९ जागा
सहाय्यक भांडारपाल – १३८ जागा
कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक – ०८ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ४ हजार ४९७ जागा

(वाचा: SBI Recruitment 2023: स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ‘या’ पदांसाठी भरती; जाणून घ्या पदे, पात्रता, वेतन)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदाच्या आवश्यकतेनुसार भिन्न असून त्याचे तपशील अधिसूचनेत आणि संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या दोन्हींच्या लिंक खाली जोडल्या गेल्या आहेत.

अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख: ०३ नोव्हेंबर २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २४ नोव्हेंबर २०२३

निवड प्रक्रिया: संगणक आधारित चाचणी/ परीक्षा

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात सविस्तर अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरतीसकरिता थेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया ०३ नोव्हेंबर २०२३ पासून सुरू होणार आहे. तर अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजे २४ नोव्हेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. तसेच अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक ती सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडावी. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: Tips for Communication Skills: करिअर मध्ये यशस्वी होण्यासाठी कम्युनिकेशन स्किल कमी पडतय? मग ‘या’ टिप्स फॉलो करा)

Source link

Jalsampada Vibhag Bharti 2023Water Resource Department Recruitment 2023WRD Maharashtra Bharti 2023जलसंपदा विभाग भरतीजलसंपदा विभाग भरती २०२३राज्य सरकार भरती
Comments (0)
Add Comment