या भरतीकरिता पदांनुसार इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज प्रक्रिया ०६ नोव्हेंबर २०२३ पासून सुरु होईल तर २७ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरती मधील पदे, पात्रता, वेतन, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया याची सविस्तर माहिती पाहूया.
(फोटो सौजन्य: शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड)
‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
मास्टर मरिनर – १७ जागा
मुख्य अभियंता – २६ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ४३ जागा
शैक्षणिक पात्रता: संबधित विषयातील मास्टर्स पदवी. या व्यतिरिक्त शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून त्याचे तपशील अधिसूचनेत नमूद केले आहेत. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली आहे.
(Candidates should have completed minimum 3 years sea time after obtaining Masters FG COC/MEO Class I COC, out of which at least 2 years sea-time must be in the substantive rank of Master or Chief Engineer. Certificate of Competency must be issued by the Govt. of India)
(वाचा: Career In BBA: उत्तम पगार मिळवून देणार्या ‘बीबीए’ कोर्स विषयी जाणून घ्या सविस्तर माहिती; ‘या’ आहेत संधी)
वेतन: ८० हजार ते २ लाख २० हजार (मासिक)
नोकरी ठिकाण: मुंबई
वयोमर्यादा: कमाल वय ४५ वर्षे तर कमाल वयोमर्यादेत ओबीसी प्रवर्गाला ०३ वर्षांची आणि एससी/ एसटी प्रवर्गाला ०५ वर्षांची सवलत आहे.
अर्ज शुल्क: या भरतीकरिता ५०० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. राखीव प्रवर्गासाठी केवळ १०० रुपये अर्जशुल्क आहे.
अर्ज पद्धती: ऑफलाईन
निवड प्रक्रिया: मुलाखतीद्वारे
अर्ज पाठविण्याचा पत्ता: द शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, २४५, मादाम कामा रोड, नरिमन पॉइंट, मुंबई, पिन कोड ४०००२१
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: ०६ नोव्हेंबर २०२३
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘द शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच २७ नोव्हेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक ती सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडावी. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
(वाचा: Silvassa Anganwadi Bharti 2023: अंगणवाडी मदतनीस पदासाठी मोठी भरती; आजच करा अर्ज)