केंद्र सरकारी नोकरीची संधी; पदवीधरांसाठी गेल इंडियाने जाहीर केली ‘या’ पदांवर भरती

GAIL Recruitment 2023 For Chief Manager: सरकारी नोकरीच्या शोधत असणार्‍या आणि सरकारी कंपनी काम करण्याची इच्छा आहे, अश्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या गेल इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये Chief Manager (मुख्य व्यवस्थापक) पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या पदाच्या एकूण १२ रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. या रिक्त पदांवरील भरतीसाठी प्रवर्गानुसार आरक्षित जागाही ठेवण्यात आल्या आहेत.

गेल इंडिया लिमिटेडमध्ये चीफ मॅनेजर (एचआर) पदासाठी अर्ज करण्याच इच्छुक व पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट gailonline.com वर भरती सेक्शनमध्ये उपलब्ध असलेल्या Online Applicationफॉर्मच्या माध्यमातून किंवा या बातमीत खाली दिलेल्या लिंकच्या माध्यमातून थेट अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रियेचे तीन टप्पे आहेत, ज्यात पदाची माहिती, वैयक्तिक माहिती, शिक्षण, अनुभव आदि माहिती भरून सदर अर्ज सबमिट करायचे आहे. या अर्जासाठी त्यांना शुल्क भरायचे आहे. अर्ज प्रक्रिया १ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अखेरची मुदत ३० नोव्हेंबर २०२३, सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत आहे.

पदभरतीचा तपशील :

संस्था : गेल इंडिया लिमिटेड (Gail India Limited)
भरले जाणारे पद : मुख्य व्यवस्थापक (Chief Manager)
पद संख्या : १२ पदे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० नोव्हेंबर २०२३

(वाचा : Film City Recruitment 2023: फिल्मसिटीमध्ये नोकरीची संधी, जाणून या भरतीचा घ्या तपशील)

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  • या पदासाठी अर्ज करणार्‍या उमेदवारचे पदवी (Bachelors) पर्यंत शिक्षण झालेले असून किमान ६० टक्के गुण असणे आवश्यक आहे.
  • शिवाय, २ वर्षांच्या एमबीए / एमएसडब्ल्यू Personal Management and Industrial Relations / Humans Resources Management स्पेशलायझेशन केलेले असून किमान ६५ टक्के गुणांसह पास असणे आवशयक आहे.
  • बॅचलर पदवी किमान ६० % गुणांसह आणि २ वर्षांची पदव्युत्तर पदवी / २ वर्षांची पीजी डिप्लोमा पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :

उमेदवारांचे वय ३० नोव्हेंबर २०२३ रोजी ४० वर्षांहून अधिक नसावे. आरक्षित प्रवर्गांतील (एससी, एसटी, ओबीसी व अन्य) उमेदवारांना सरकारी नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. अधिक माहितीसाठी चीफ मॅनेजर भरतीची अधिसूचना पाहावी.

परीक्षा शुल्क :

या भरतीमध्ये अर्ज करणार्‍या उमेदवाराला २०० रुपये परीक्षा शुल्क भरावे अनिवार्य असेल.

महत्वाच्या लिंक्स :

Gail India मधील Chief Manger (HR) पद भरतीविषयी अधिक माहितीसाठी जाहिरात वाचा. जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

(वाचा : Mahavitaran Recruitment 2023: डिप्लोमा आणि डिग्री धारकांसाठी महावितरणमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; असा करा अर्ज)

Source link

gail india limitedGail India recruitment 2023 vacancygail recruitment 2023GAIL Recruitment 2023 For Chief Managergailonline.comgovernment jobsगेल इंडिया भरती २०२३
Comments (0)
Add Comment