Indian Oil मधील ही भरती प्रक्रिया संपूर्ण भारतभर होणार असून, यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात येणार नाही. यामध्ये उमेदवारांना पगार हा पदानुसार शासनाच्या नियमाप्रमाणे देण्यात येणार आहे.
वयोमर्यादा :
सदर जागांसाठी अर्ज करणार्या उमेदवाराचे वय ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी १८ ते २४ वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच, यामध्ये एससी / एसटी प्रवर्गातील उमेदवारांना ०५ वर्षे तर, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ०३ वर्षाची शिथिलता देण्यात आलेली आहे.
शैक्षणिक पात्रता :
० इंडियन ऑइलमधील ही भरती ट्रेड अप्रेंटिस तसेच, टेक्निशियन अप्रेंटिस पदाकरिता होणार आहे.
० या जागांसाठी अर्ज करणार्या उमेदवारने कमीत कमी मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी उत्तीर्ण + आयटीआय / बारावी उत्तीर्ण / बी ए / बी कॉम (कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर) असणे आवश्यक आहे.
(वाचा : NMMC Recruitment 2023: नवी मुंबई महानगरपालिका, आरोग्य विभाग भरती; थेट मुलाखतीमधून होणार निवड)
महत्त्वाच्या तारखा :
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० नोव्हेंबर २०२३, सायंकाळी ५ वाजेपर्यंत
- Admit Card डाउनलोड करण्याची तारीख : अंदाजे, २७ नोव्हेंबर २०२३ ते २ डिसेंबर २०२३
- लेखी परीक्षेची तारीख : अंदाजे, ३ डिसेंबर २०२३
- लेखी परीक्षेच्या निकालाची तारीख : अंदाजे, १३ डिसेंबर २०२३
- कागदपत्र पडताळणीची तारीख : अंदाजे, १८ डिसेंबर २०२३ ते २६ डिसेंबर २०२३
(महत्त्वाच्या तारखांच्या बदलांविषयी अधिक महितीसाठी मुख्य वेबसाइटवर लक्ष ठेवा)
महत्त्वाचे :
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरूनच सादर करायचे आहेत.
- ऑफलाइन कुरिअरने किंवा पोस्टाने आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
- उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेल्या ई-मेल आय-डी व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- उमेदवाराने अर्जामध्ये दिलेले माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
- दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
- भरतीचे तर सर्व अधिकार Indian Oil Corporation Limited कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
महत्त्वाच्या लिंक्स :
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमधील भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमधील Apprenticeship Recruitment साठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
(वाचा : GAIL Recruitment 2023 : पदवीधरांसाठी गेल इंडियाने जाहीर केली ‘या’ पदांवर भरती; मिळणार लाखोंमध्ये पगार)