१० वी पास आणि पदवीधरांसाठी आयकर विभागात नोकरीची संधी; ऑफलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात

Income Tax Department Recruitment 2023 : भारतीय आयकर विभाग अंतर्गत कर सहाय्यक (Tax Assistant) आणि हवालदार (Havaldar) पदाच्या जागांवर पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून कर सहाय्यक आणि हवालदार पदांच्या एकूण २९ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२३ आहे.

पदभरतीचा तपशील :

संस्था : भारतीय आयकर विभाग (Income Tax Department, India)

भरली जाणारी पदे :

एकूण रिक्त पदे : २९ जागा

1. कर सहाय्यक : १८ जागा
2. हवालदार : ११ जागा

(वाचा : NMMC Recruitment 2023: नवी मुंबई महानगरपालिका, आरोग्य विभाग भरती; थेट मुलाखतीमधून होणार निवड)

वयोमर्यादा : १८ ते २७ वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० नोव्हेंबर २०२३

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कस्टम्स, कार्मिक आणि आस्थापना विभागाचे सहाय्यक/ उपायुक्त, ८ वा मजला, नवीन कस्टम हाउस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – ४०० ००१

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

कर सहाय्यक पदासाठी :

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष.
  • कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्सच्या वापराचे प्राथमिक ज्ञान असावे.
  • डेटा एंट्री कामासाठी प्रति तास ८००० की डिप्रेशनपेक्षा कमी नसावा.

हवालदार पदासाठी :

  • कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून मॅट्रिक किंवा समकक्ष.

(वाचा : GAIL Recruitment 2023 : पदवीधरांसाठी गेल इंडियाने जाहीर केली ‘या’ पदांवर भरती; मिळणार लाखोंमध्ये पगार)

मिळणार एवढा पगार :

कर सहाय्यक : (Pay Matrix L-4) २५ हजार ५०० रुपये ते ८१ हजार १०० रुपये as per 7th CPC

हवालदार : (Pay Matrix L-1) १८ हजार रुपये ते ५६ हजार ९०० रुपये as per 7th CPC

असा करा अर्ज :

1. या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर अर्ज सादर करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

महत्त्वाच्या लिंक्स :

Income Tax Department Recruitment 2023 मधील कर सहाय्यक (Tax Assistant) आणि हवालदार (Havaldar) पदाच्या भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Income Tax Department Recruitment 2023 मधील कर सहाय्यक (Tax Assistant) आणि हवालदार (Hawaldar) भरतीच्या अर्जाचा नमुना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Income Tax Department च्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

(वाचा : Central Bank of India Recruitment 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर पदावर भरती सुरु: पदवीधर करू शकतात अर्ज)

Source link

havaldar jobsincome taxincome tax bharti 2023income tax department bhartiincome tax department recruitment 2023tax assistant jobsआयकर विभाग भरती २०२३आयकर विभागात भरतीभारतीय आयकर विभाग
Comments (0)
Add Comment