स्वयम पोर्टलवरील अभ्यासक्रमांचा फायदा नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम शिकण्यासाठी आणि त्याचे क्रेडिट ट्रान्स्फर करण्यासाठी होणार आहे.
उच्च शिक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्वयम मंडळाच्या अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत जानेवारी २०२४ पासून सुरू होणाऱ्या सत्रासाठी तब्बल १ हजार २४७ अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली आहे. या अंतर्गत यूजीसीने बुद्धिस्ट संस्कृती आणि पर्यटन या विषयावर चार अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहे. हे सर्व अभ्यासक्रमही उपलब्ध करण्यात येणार आहेत. हे नवे अभ्यासक्रम शैक्षणिक विभागप्रमुख आणि अधिष्ठात्यांनी संबंधित अधिकार मंडळासमोर मांडून क्रेडिट हस्तांतरणासाठी उपलब्ध करण्याची सूचना यूजीसीच्यावतीने करण्यात आली आहे.
सर्व अभ्यासक्रमांसाठी क्रेडिट निश्चित करण्यात आले आहेत. देशातील आणि जगभरातीलही विद्यार्थी या अभ्यासक्रमांसाठी नोंदणी करून अभ्यास करू शकतात. नव्या १,२४७ अभ्यासक्रमांमध्ये राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ अशा उच्च शिक्षण संस्थांच्या अभ्यासक्रमांचाही समावेश असून, ते विद्यार्थ्यांना विनामूल्य शिकता येणार आहे. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा १८, १९, २५ आणि २६ मे रोजी होणार आहे, असे युजीसीने जाहीर केले आहे. या सर्व अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आदींची माहिती स्वयमच्या www.swayam.gov.in/UGC पोर्टलवर उपलब्ध आहे, असे युजीसीचे सचिव प्रा. मनीष जोशी यांनी सांगितले.
(वाचा : SWAYAM Portal Courses : ‘स्वयम पोर्टल’वर करता येणार नववी ते पदवी पर्यंतचे अभ्यासक्रम; जाणून घ्या कसे)