या पदासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून १५ नोव्हेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याची सविस्तर माहिती पाहूया.
‘टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
अकाऊंट ऑफिसर (FAP) – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता: कॉमर्स शाखेटून पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच संबधित कामाचा एक वर्षाचा अनुभव असावा. अकाऊंट ऑफिसर पदासाठी आवश्यक असणारे सर्व संगणकीय ज्ञान त्याला असावे. या व्यतिरिक्त विस्तृत पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली आहे.
(वाचा: Tips For History Study: इतिहास शिकताना तारखा लक्षात ठेवणं कठीण जातय? मग ‘या’ सोप्या टिप्स एकदा वाचाच)
वेतन: ५० हजार (मासिक)
नोकरी ठिकाण: मुंबई
वयोमर्यादा: ४५ वर्षे
अर्ज शुल्क: या भरतीकरिता ५०० रुपये अर्जशुल्क आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी १२५ रुपये अर्जशुल्क आहे.
अर्ज पद्धती: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ नोव्हेंबर २०२३
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस , मुंबई’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच १५ नोव्हेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक ती सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडावी. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
(वाचा: Mumbai Custom Recruitment 2023: ‘मुंबई कस्टम विभाग’ येथे विविध पदांची भरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन)