पश्चिम रेल्वे अंतर्गत होणाऱ्या या भरतीच्या माध्यमातून ‘गट क’ आणि ‘गट ड’ या संवर्गातील रिक्त पदे भरली जाणार आहेत. सदर पदांच्या भरतीसाठी १० नोव्हेंबरपासून ऑनलाइन अर्ज भरण्याला आणि स्वीकृतीस सुरुवात होणार आहे. तसेच, अर्जदारास ०९ डिसेंबर २०२३ पूर्वी अर्ज करणे बंधनकारक आहे. भरतीविषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
पद भरतीचा तपशील :
एकूण रिक्त पदे : ६४ जागा
पदाचे नाव : वरील भरती अंतर्गत ‘गट क’ आणि ‘गट ड’ पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
नोकरी ठिकाण : ही भरती मुंबई या ठिकाणी होत आहे
शैक्षणिक पात्रता :
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचा.
(वाचा : १० वी पास आणि पदवीधरांसाठी Income Tax Department मध्ये नोकरीची संधी; ऑफलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात)
वयोमर्यादा :
पश्चिम रेल्वे, मुंबई अंतर्गत भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांची वयोमर्यादा १८ वर्षे ते २५ वर्षे इतकी आहे.
अर्ज शुल्काविषयी :
- सर्व उमेदवारांसाठी रुपये ५००रुपये शुल्क भरावे लागेल.
- तर, SC/ST/Ex-servicemen उमेदवारांसाठी २५० रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे.
अर्ज पद्धती :
Western Railway Recruitment 2023 साठी ऑनलाइन अर्ज करायचे आहेत.
महत्त्वाच्या तारखा :
अर्ज प्रक्रियेला सुरुवात : १० नोव्हेंबर २०२३ पासून.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०९ डिसेंबर २०२३ पर्यंत.
असा करा अर्ज :
-या भरतीकरिता अर्जऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज करण्यासाठी https://www.rrc-wr.com/ या लिंकचा वापर करा.
-उमेदवारांनी वर दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
महत्त्वाच्या लिंक्स :
0 भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी https://www.rrc-wr.com/ या लिंकवर क्लिक करा.
0 Western Railway Recruitment 2023 भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
(वाचा : GAIL Recruitment 2023 : पदवीधरांसाठी गेल इंडियाने जाहीर केली ‘या’ पदांवर भरती; मिळणार लाखोंमध्ये पगार)