मुंबई विद्यापीठास सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा पुरस्कार जाहीर; राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कारात ठरले अव्वल, निस्वार्थ सेवेचा यथोचित गौरव

Mumbai University News: राज्य शासनाने राष्ट्रीय सेवा योजनेचे पुरस्कार जाहीर केले असून मुंबई विद्यापीठास ‘सर्वोत्कृष्ट विद्यापीठा’चा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव तथा कार्यक्रम समन्वयक सुधीर पुराणिक यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सन २०२१-२२ या वर्षासाठी जाहीर केलेल्या राज्यस्तरीय पुरस्कारात मुंबई विद्यापीठ अव्वल ठरले आहे. निस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने समाजाची सेवा करणाऱ्यांना त्यांच्या अंगिकृत कामात प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या निस्वार्थ सेवेचा यथोचित गौरव करण्याच्या दृष्टिने मुंबई विद्यापीठास राष्ट्रीय सेवा योजनेचे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाने दिलेल्या भरीव योगदानाची आणि केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत विद्यापीठास सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार म्हणून आर. डी. नेशनल महाविद्यालयातील विजेंद्र शेखावत यांची निवड करण्यात आली. तर, याच महाविद्यालयास सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर या महाविद्यालयातील विद्यार्थी ए. सेल्वा प्रकाश या विद्यार्थ्यास सर्वोत्कृष्ट स्वयंसेवकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम देऊन या सर्व विजेत्यांचा यथोचित सत्कार केला जाणार आहे.

(वाचा : ‘छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महोत्सवा’चे आयोजन; Mumbai University आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार)

मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाने पुरस्कार जाहीर केलेल्या वर्षात उल्लेखनिय कामगीरी केली आहे. विविध रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सर्वाधिक ७८,९४५ युनिट रक्त जमा, सुमारे २ कोटी रुपयाची पुरग्रस्ताना मदत, कम्युनिटी किचनच्या माध्यमातून अनेक गरजवंताना मदत, आर्सेनिक अल्बलचे वाटप, दोन हजाराहून अधिक गृहसंकुलाचे निर्जंतुकीकरण, मास्क आणि सेनेटायझरचे वाटप, दत्तक गावे, आरोग्य, नेत्र, लसीकरण शिबिरांचे आयोजन, वृक्षारोपण, पल्स पोलिओ लसीकरण मोहीम, कोव्हिड लसीकरण मोहीम, विविध जनजागृतीचे कार्यक्रम, एड्स/ आरोग्य विषयक जनजागृती, पर्यावरण जनजागृती, बेटी बचाओ/महिला सशक्तीकरण, उद्योजकता विकास कार्यक्रम, अंमली पदार्थ आणि द्रव्यांचा गैरवापर रोखणे, अल्पसंख्याक हक्कांबाबात जनजागृती, अन्न सुरक्षा आणि अन्नाचे महत्त्व, एक भारत श्रेष्ठ भारत, प्राण्यांचे कल्याण आणि प्राण्यांवरील क्रौर्य रोखणे आणि कायदा, सायबर जागृकता, वाचन प्रेरणा दिन, कुटुंब कल्याण, सेंद्रीय शेती बाबत जागृकता, स्टेम सेल, थेलेसेमिया जागृकता, कर्करोग जागृकता, बांबू आणि इको फ्रेंडली उत्पादने, सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट, फिट इंडिया अभियान, स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आयोजित विविध कार्यक्रमे, विविध समाजकल्याण योजना, मतदार जनजागृती, योगा कार्यक्रम, हरीत खेडे, खेड्यापाड्यातील सार्वजनिक ग्रंथालये आणि स्टार्ट अप आणि इन्क्युबेशन ‘गो शून्य’, रोटरी क्लबच्या माध्यमातून विद्यानगरी संकुलात बायोडायव्हर्सिटी पार्कची निर्मिती, सौंदर्यीकरण असे विविध कार्यक्रम आणि समाजपयोगी उपक्रम मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या मार्फत वर्षभर राबविले गेले. २०२१-२२ या वर्षात रक्तदानासाठी राज्यस्तरीय पुरस्कारांने मुंबई विद्यापीठास गौरविण्यात आले. आजमितीस मुंबई विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेची ४५९ युनिट कार्यरत असून ४१,५०० स्वयंसेवक कार्यरत आहेत.

निस्वार्थ सेवेचा केलेला यथोचित गौरव :

“मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षामार्फत नेहमीच विविध समाजपयोगी उपक्रम राबविली जातात. एनएसएसच्या माध्यमातून दिलेल्या भरीव योगदानाची आणि केलेल्या उल्लेखनिय कामगिरीची दखल घेऊन राज्य शासनाने मुंबई विद्यापीठाच्या या निस्वार्थ सेवेचा केलेला यथोचित गौरव ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
-प्रा. रवींद्र कुलकर्णी (कुलगुरू, मुंबई विद्यापीठ)

(वाचा : Mumbai University चा कार्बन न्युट्रल ग्रीन कँपससाठी पुढाकार; पहिल्या टप्प्यात विद्यानगरी संकुलासाठी योजना तयार)

Source link

Best University Award AnnouncedBest University Award to Mumbai Universitymumbai university newsMumbai University NSS UnitNational Service Schemenssravindra kulkarniमुंबई विद्यापीठमुंबई विद्यापीठ सर्वोत्कृष्ट विद्यापीठराष्ट्रीय सेवा योजना
Comments (0)
Add Comment