मराठी भाषा विद्यापीठ पुढील वर्षापासून; येत्या हिवाळी अधिवेशनात विधेयक मंजूर करण्यात येईल

Marathi Language University: रिद्धपुरला (जि.अमरावती) मराठी भाषा विद्यापीठ उभारण्यासाठी विधिमंडळाच्या येत्या हिवाळी अधिवेशनात विधेयक मंजूर करण्यात येईल. पुढील वर्षीच्या जूनपासून हे विद्यापीठ सुरू करण्याचे नियोजन करण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिली

मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने सोमवारी मंत्री पाटील यांच्या दालनात मराठी भाषा विद्यापीठा स्थापने बाबतचा अहवाल सादर केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी समितीचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, सदस्य प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, डॉ. रमेश वरखेडे, डॉ. अविनाश आवलगावकर, कारंजेकर बाबा, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेश देवळाणकर आदी उपस्थित होते.

(वाचा : १० वी पास आणि पदवीधरांसाठी Income Tax Department मध्ये नोकरीची संधी; ऑफलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात)

मराठी भाषा विद्यापीठ सुरू व्हावे, अशी मागणी अनेक वर्षापासून होती. या मागणीचे महत्व लक्षात घेऊन राज्य सरकारने समिती स्थापन केली होती. समितीने दोन महिन्यांत आपला अहवाल पूर्ण केला आहे. हा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात येईल. या मसुदा समितीचे रूपांतर मराठी भाषा विद्यापीठाच्या सल्लागार समितीत करावे.

मराठी भाषा विद्यापीठाच्या स्थापनेसाठी समितीचे यापुढेही सहकार्य राहील. रिद्धपूर येथे लीळा चरित्र लिहिण्याबरोबरच मराठी भाषेतील ग्रंथ निर्मितीचे केंद्रही राहिले आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन होईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

मराठी भाषा विद्यापीठात विविध ज्ञानशाखा, शिक्षणक्रम आणि अभ्यासक्रम राबविताना विद्यार्थी रोजगारक्षम होतील, याचाही विचार करण्यात आला आहे. पारंपरिक विद्यापीठांपेक्षा मराठी भाषा विद्यापीठ महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा वेगळेपण केंद्रस्थानी ठेऊन अभ्यासक्रमांच्या माध्यमातून संस्कृतीचे संवर्धन आणि जतन करण्यात येईल, असे समितीचे अध्यक्ष डॉ. मोरे यांनी सांगितले.

(वाचा : IOCL Recruitment 2023 : इंडियन ऑइलमध्ये १७६० जागांवर महाभरती; दहावी, बारावी आणि आयटीआय पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी)

Source link

language universitymarathi language universityअमरावतीअमरावती ताज्या बातम्यामराठी भाषा विद्यापीठ
Comments (0)
Add Comment