या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. या मुलाखती २१ नोव्हेंबर रोजी होणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहण्याचे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे. तेव्हा या भरती मधील पदे, पात्रता, वेतन याचे सर्व तपशील जाणून घेऊया.
‘लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालय भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
सहायक प्राध्यापक – ०२ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०२ जागा
शैक्षणिक पात्रता: महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत पदव्युत्तर पदविका म्हणजेच संबंधित विषयात एमडी/डीएनबी असणे गरजेचे आहे.
(वाचा: Tips For History Study: इतिहास शिकताना तारखा लक्षात ठेवणं कठीण जातय? मग ‘या’ सोप्या टिप्स एकदा वाचाच)
नोकरी ठिकाण: मुंबई
वयोमर्यादा: किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३८ वर्षे. राखीव प्रवर्गाला कमाल वयोमार्यादेत सूट आहे.
वेतन : ०१ लाख रुपये / प्रतिमहिना
निवड प्रक्रिया: मुलाखतीद्वारे
मुलाखतीचा पत्ता: अधिष्ठाता, लोकमान्य टिळक महानगरपालिका सार्वजनिक रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, शीव, मुंबई ४०००२२
मुलाखतीची तारीख: २१ नोव्हेंबर २०२३
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘बृहन्मुंबई महानगरपालिका’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: इच्छुक उमेदवारांनी रुग्णालयाच्या मुख्य लिपिक यांच्याकडून प्रत्यक्ष अर्ज प्राप्त करून तो १७ नोव्हेंबर पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावा.
मुलाखत प्रक्रिया: या भरतीकरिता थेट मुलाखत पद्धतीने पद्धतीने निवड होणार आहे. उमेदवारांनी मुलाखतीस येण्याआधी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे. तसेच अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक ती सर्व कागदपत्रे मुलाखतीस येताना सोबत आणवीत. पात्र उमेदवारांनी २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता मुलाखतीस हजर राहावे.
(वाचा: RCFL Recruitment 2023: राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स येथे ‘सल्लागार’ पदासाठी भरती; ‘ही’ आहे पात्रता)