अरेरे! ६० कोटींचं बजेट असलेल्या सिनेमाची अशी अवस्था, कंगनाच्या ‘तेजस’नं १२ दिवसात कमावले फक्त…

मुंबई: बॉलिवूडला बायकॉट करा…असं सांगणं अभिनेत्री कंगना रणौत हिला चांगलंच महागात पडलं आहे. ज्या सिनेमाकडून कंगनाला मोठ्या अपेक्षा होत्या, तो तेजस सिनेमा फ्लॉप ठरला आहे. बिग बजेट सिनेमाचे आकडे निराशाजनक आहेत. प्रेक्षकांना कंगनाच्या या सिनेमाला नाकारलं आहे. २७ ऑक्टोबर रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण पहिल्या दिवसापासूनच सिनेमानं म्हणावी तशी कमाई केली नव्हती. तर आता दिवसांत सिनेमानं फक्त ६ कोटींची कमाई केली आहे.

गेल्या काही वर्षात कंगनाच्या फ्लॉप सिनेमांची यादी वाढतच चालली आहे. पण तेजस सिनेमा हा फ्लॉप सिनेमांच्या गाडीला ब्रेक लावेल, असं कंगनाला वाटत होतं. पण झालं नाही. उलट सिनेमाकडं प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. तेजस हा कंगनाचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट होता, पण हा सिनेमा डिजास्टर ठरलाय. पहिल्या दिवशी सिनेमानं १.२५ कोटींची कमाई केली होती. पण त्यानंतर सिनेमाच्या कमाईत घट होत गेली. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर दसऱ्या शुक्रवारी सिनेमानं फक्त ८ लाखांची कमाई केली.

बजेट किती?
कंगनाच्या या तेजस सिनेमाच्या बजेटबद्दल बोलायचं झालं तर, सिनेमाचं बजेट ६० ते ७० कोटींच्या जवळपास आहे. बजेटच्या तुलनेत सिनेमाची कमाई खूपच कमी झाली आहे. त्यामुळं हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर डिजास्टर ठरला.
हे काम मी… सिद्धिविनायक मंदिर अध्यक्षपदावरून पायउतार होताना आदेश बांदेकरांना अश्रू अनावर; म्हणाले-

तगडी टक्कर
कंगनाच्या तेजस सिनेमाला विक्रांत मेस्सीच्या 12th Fail या सिनेमानं तगडी टक्कर दिल्याचं पाहायला मिळालं. या कमी बजेट असेलल्या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.
४० वर्षांपासून आजाराशी झुंजत होत्या झिनत अमान, दिसणंही कमी झालेलं…अभिनेत्रीने सांगितलं नेमकं काय झालेलं?
दरम्यान, कंगनाच्या भूमिकेबद्दल बोलायचं झालं तर, हवाईदलावर बेतलेल्या ‘तेजस’ चित्रपटात तेजस गिल या लढाऊ वैमानिकाची भूमिका कंगना रणौत हिनं साकारली आहे. हवाईदलात मागील २० वर्षांत ज्या काही महत्त्वपूर्ण आणि देशाप्रती समर्पण भाव उत्कट करणाऱ्या घटना घडल्या आहेत, त्यांचा हा धांडोळा आहे. सत्य घटनांनी प्रेरित आणि त्याच वेळी काल्पनिक, अशा मिश्रणातील हा चित्रपट आहे, असं सर्वेश मेवरा यांनी सांगितलं .

Source link

Kangana Ranautkangana ranaut moviekangana ranaut tejas movietejas box office collectiontejas movietejas movie box office collectiontejas movie budgettejas movie casttejas movie story
Comments (0)
Add Comment