पुणे महानगरपालिकेत पशूवैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती; पगारही आहे भरपूर

Pune Mahanagarpalika Bharti 2023: तुम्ही जर पशुवैद्यकीय शिक्षण घेतले असेल आणि उत्तम नोकरीची वाट पाहत असाल तर पुणे महानगर पालिकेत एक सुवर्णसंधी आहे. पुणे महानगरपालिका अंतर्गत ‘पशुवैद्यकीय अधिकारी’ या पदाच्या एकूण ०२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच याबाबत पालिकेने अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

या पदासाथी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून १७ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती पाहूया.

‘पुणे महानगरपालिका भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
पशुवैद्यकीय अधिकारी: ०२ जागा
एकूण रिक्त पदसंख्या: ०२ जागा

शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी अथवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

(वाचा: Tips For History Study: इतिहास शिकताना तारखा लक्षात ठेवणं कठीण जातय? मग ‘या’ सोप्या टिप्स एकदा वाचाच)

वेतन: ४५ हजार (मासिक)

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: कॅ. वडके सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १७ नोव्हेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘पुणे महानगरपालिका’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच १७ नोव्हेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक ती सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडावी. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: LTMGH Hospital Bharti 2023: मुंबईच्या सायन हॉस्पिटल मध्ये ‘या’ पदांची भरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन)

Source link

PMC Bharti 2023pmc recruitment 2023Pune Mahanagarpalika Bharti 2023Pune Municipal Corporation bharti 2023पुणे महानगरपालिका भरती २०२३पुणे महापालिका भरती २०२३
Comments (0)
Add Comment