विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून मुंबई विद्यापीठास संशोधनासाठी अनुदान; डीएसटी-फिस्ट अंतर्गत रसायनशास्त्र विभागास ९४ लाखांचे अनुदान

Mumbai University News: मुंबई विद्यापीठाच्या रसायन शास्त्र (स्वायत्त) विभागास केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून संशोधनासाठी ९४ लाखांचे अनुदान मिळाले आहे. संशोधनाच्या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार विभागातील संशोधन आणि अनुषंगिक पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी हे अनुदान मिळाले आहे.

नॅनो टेक्नोलॉजी आणि मटेरिअल सायन्स या उद्योन्मुख क्षेत्रात अधिकाधीक संशोधनावर भर दिला जाणार असून याअंतर्गत एनर्जी स्टोरेज डिव्हाईसेस, ऑर्गेनिक लाईट इमिटींग डायोड्स, सेमी कंडक्टर मटेरिअल्स, सेन्सर्स आणि पॉलिमर नॅनो कंपोझिट अनुषंगिक विषयावर संखोल संशोधन केले जाणार असल्याचे विभागप्रमुख प्रा. शिवराम गर्जे यांनी सांगितले.

(वाचा : Mumbai University News: मुंबई विद्यापीठास सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा पुरस्कार जाहीर)

मुंबई विद्यापीठाच्या रसायन शास्त्र विभागास मिळालेल्या या अनुदानामुळे विभागातील संशोधन आणि विकासासाठी विद्यमान पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण करून संशोधनाला चालना देण्यावर अधिक भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. डीएसटी-फिस्ट अंतर्गत मंजूर होणाऱ्या अनुदानामुळे विद्यापीठ विभागातील संशोधन क्षमता, प्राध्यापक आणि संशोधकांच्या गुणवत्तेवर राष्ट्रीय मान्यतेची मोहोर उमटत असल्याने यांस विशेष महत्व असते.

केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या माध्यमातून संशोधन आणि विकास क्षेत्रातील पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण करणे, नवीन आणि उद्योन्मुख क्षेत्रात संशोधनवृद्धीस चालना देणे आणि विद्यापीठ व उच्च शिक्षण संस्थामध्ये नवप्रतिभावंताना आकर्षित करण्यासाठी ५ वर्षांच्या कालावधीसाठी हे अनुदान दिले जाते.

(वाचा : ‘छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महोत्सवा’चे आयोजन; Mumbai University आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार)

Source link

Ministry of Science and Technologymumbai universitymumbai university newsमुंबईमुंबई विद्यापीठ
Comments (0)
Add Comment