ठाणे महानगरपालिकेत परिचारिकांसाठी मोठी भरती, आजच करा अर्ज

Thane Municipal Corporation 2023: तुम्ही जर नर्सिंगचे शिक्षण घेतले असेल नोकरीच्या शोधात असाल तर ठाणे महानगर पालिकेत उत्तम संधी चालून आली आहे. ठाणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय यांच्या आस्थापनेत परिचारिका/ नर्स पदांची भरती करण्यात येणार आहे. याद्वारे १०० परिचारिकांची नियुक्ती केली जाणार आहे. नुकतीच याबाबत ठाणे महानगरपालिकेने अधिसूचना जाहीर केली आहे.

या पदांकरिता इछुक आणि पात्र उमेदवारांची थेट मुलाखत पद्धतीने पद्धतीने निवड केली जाणार आहे. या मुळाखाली २२ नोव्हेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. तेव्हा ठाणे महानगरपालिकेच्या या भरतीमधील पदे, पात्रता, वेतन, मुलाखत प्रक्रिया याबाबतची सर्व माहिती पाहूया.

‘ठाणे महानगरपालिका भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
परिचारिका – १०० जागा
एकूण रिक्त पदसंख्या – १०० जागा

शैक्षणिक पात्रता: महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची मान्यता असलेली ‘जीएनएम’ पदवी किंवा बीएससी नर्सिंग असल्यास प्राधान्य दिले जाईल. तसेच संबधित कामाचा तीन वर्षांचा अनुभव असावा.

(वाचा: Pune Mahanagarpalika Bharti 2023: पुणे महानगर पालिकेत पशूवैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती; पगारही आहे भरपूर)

वेतन: ३० हजार / मासिक

नोकरी ठिकाण: ठाणे

वयोमर्यादा: कमाल वय ४० वर्षे यामध्ये राखीव प्रवर्गाला सवलत आहे.

निवड प्रक्रिया:
मुलाखतीद्वारे

मुलाखतीचा पत्ता: कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.

मुलाखतीची तारीख: २२ नोव्हेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘ठाणे महानगर पालिका’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुलाखत प्रक्रिया: या भरतीकरिता थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. या मुलाखती २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक ती सर्व कागदपत्रे घेऊन मुलाखतीस उपस्थित राहायचे आहे. उमेदवारांनी मुलाखतीस येण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: LTMGH Hospital Bharti 2023: मुंबईच्या सायन हॉस्पिटल मध्ये ‘या’ पदांची भरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन)

Source link

Thane Mahanagarpalika Bharti 2023Thane Mahanagarpalika Recruitment 2023Thane Municipal Corporation jobs 2023Thane Municipal Corporation Recruitment 2023ठाणे महानगरपालिका भरती २०२३ठाणे महापालिका भरती २०२३
Comments (0)
Add Comment