सदर भरती अंतर्गत विधी अधिकारी गट अ, विधी अधिकारी गट ब व विधी अधिकारी यांची रिक्त पदे भरण्यासाठी नमूद अटी व पात्रता पूर्ण करीत असलेल्या उमेदवारांना ११ महिन्यासाठी पुर्णपणे कंत्राटी पद्धतीने नियुक्तीसाठी हे अर्ज मागवले जात आहेत.
पदभरतीचा तपशील :
एकूण रिक्त जागा : १४ पदे
विधी अधिकारी गट अ : १ जागा
विधी अधिकारी गट ब : ४ जागा
विधी अधिकारी : ९ जागा
अर्ज प्रक्रियेविषयी महत्त्वाचे :
- उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- इतर कोणत्याही मार्गानी केलेले अर्ज स्विकारले जाणार नाही.
- अर्ज दिलेल्या पत्त्यावर २० नोव्हेंबर २०२३ पूर्वी पोहचणे अनिवार्य आहे.
- उशीरा प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
(वाचा : SIDBI Recruitment 2023 : भारतीय लघु उद्योग विकास बँकेत ‘असिस्टंट मॅनेजर’ पदासाठी भरती; थेट लिंकद्वारे असा करा अर्ज)अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस आयुक्त, ठाणे शहर, क्रिक नाका, सिडको रोड, ठाणे (प), ता. जि. ठाणे पिन नं. ४६००६०१
मिळणार एवढा पगार :
विधी अधिकारी गट अ :
एकूण ३५ हजार रुपये
(मासिक वेतन ३० हजार रुपये + दूरध्वनी व प्रवासखर्चासाठी ५ हजार रुपये)
विधी अधिकारी गट ब :
एकूण २८ हजार रुपये
(मासिक वेतन २५ हजार रुपये + दूरध्वनी व प्रवासखर्चासाठी ३ हजार रुपये)
विधी अधिकारी :
एकूण २३ हजार रुपये
(मासिक वेतन २० हजार रुपये + दूरध्वनी व प्रवासखर्चासाठी ३ हजार रुपये)
महत्त्वाचे :
- विधी अधिकारी गट अ, विधी अधिकारी गट ब व विधी अधिकारी पदाच्या भरतीसाठी अर्ज वरील पत्त्यावर २० नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावे.
- उमेदवाराने सोबत दिलेल्या विहित नमुन्यातील अर्ज पुर्णपणे भरून त्यासोबत आवश्यक प्रमाणपत्राच्या प्रती जोडून लिफाफ्यात घालून, लिफाफ्याच्या उजव्या बाजूला ठळक अक्षरात “विधी अधिकारी गट अ किंवा विधी अधिकारी गट ब किंवा विधी अधिकारी पदासाठी अर्ज” असे नमूद करावे.
- अर्जासोबत पत्रव्यवहाराकरीता उमेदवाराचा पत्ता असलेले दोन लिफाफे जोडावे (पोस्टाचे तिकीट लावावे)
- अर्जाचा नमूना www.thanepolice.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आलेला आहे. सदर अर्जाचा नमूना डाउनलोड करून अर्ज पूर्णपाने भरावा.
- पोलीस आयुक्त, ठाणे शहर कार्यालयात वरील मुदतीत हस्तेदेखील स्वीकारले जातील.
(वाचा : India Post Bharti 2023: इंडिया पोस्टमध्ये स्पोर्ट्स कोटा अंतर्गत मोठी भरती; १८९९ जागांवरील विविध पदांवर नोकरीची संधी)