हायलाइट्स:
- केंद्रीय मंत्री नारायण राणे हे त्याना झालेल्या अटकेनंतर आक्रमक झाले आहेत.
- काल त्यांना जामीन मंजूर झाल्यानंतर आज त्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
- यावेळी दिशा सालियन प्रकरणात नाव असलेल्या मंत्र्याला आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना राणेंचा इशारा.
मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे हे त्याना झालेल्या अटकेनंतर आक्रमक झाले आहेत. काल त्यांना जामीन मंजूर झाल्यानंतर आज त्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी दिशा सालियन प्रकरणात नाव असलेल्या मंत्र्याला आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेतून इशारा दिला आहे. (union minister narayan rane has warned that he will not remain silent until those ministers are arrested)
पत्रकार परिषदेत बोलताना राणे यांनी आपल्या वक्तव्याची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याची तुलना केली. तसेच विविध प्रकरणांमध्ये ज्या मंत्र्यांची नावे आलेली आहेत अशा मंत्र्यांचा त्यांची नावे न घेता उल्लेख केला. मात्र, यावेळी राणे यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे मात्र ऑडिओ क्लिप प्रकरणी नाव घेतले.
क्लिक करा आणि वाचा- तुम्ही माझं काही करू शकणार नाही, मी सर्वांना पुरून उरलोय; राणेंचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र
राणे पत्रकारांना उद्देशून म्हणाले की, ‘तुम्ही अनिल परब यांची कॅसेट ऐकली असेल. अनिल परब हे त्या ऑडिओ क्लिपमध्ये अधिकाऱ्यांना आदेश देत आहेत की पकडा त्यांना. राज्यात दुकाने फोडली जातात, बलात्कार केले जातात, हत्या केल्या जातात. दिशा सालियन प्रकरण असेल, पूजा चव्हाण प्रकरण असेल. आता मी गप्प बसणार नाही, काही होऊ द्या. त्या मंत्र्याला अटक केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही कायदेशीर लढाई लढणार आणि ते आत जाईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही.’
क्लिक करा आणि वाचा- ‘सामना’तील अग्रलेखावरून राणेंची संजय राऊत यांच्यावर तिखट शब्दात टीका
‘अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा’
दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेमागे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब हे असून त्यांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे.
क्लिक करा आणि वाचा- युवा सेनेच्या वरुण सरदेसाईंविरोधात मनसे आक्रमक; दिली ‘ही’ उपमा
नारायण राणे यांच्यावर कारवाई करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर राज्य सरकारच्या मंत्र्यांचा दबाव होता का? अनिल परब हे गृहमंत्री नसतानाही ते त्या खात्याच्या कारभारात हस्तक्षेप कसे काय करू शकतात?, जो अंतरीम जामीन अर्ज सायंकाळी चार वाजल्यानंतर निकाली निघाला, तो अर्ज नाकारण्यात येणार आहे असे मंत्री परब हे आधीच कसे काय सांगत आहेत? असे एकावर एक सवाल भाजपचे आमदार आशीष शेलार यांनी उपस्थित केले आहेत.