एमपीएससीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर; महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २८ एप्रिलला

MPSC Exam Timetable 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) येत्या २०२४ वर्षात होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले असून, त्यानुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २८ एप्रिलला होणार आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा १४ ते १६ डिसेंबर या कालावधीत नियोजित करण्यात आल्याची माहिती एमपीएससीने दिली आहे.

स्पर्धा परीक्षांची तयारी उमेदवारांना योग्य रितीने करता येण्यासाठी, परीक्षांचा अंदाज येण्यासाठी एमपीएससीकडून दरवर्षी संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते. त्यानुसार २०२४ मध्ये एमपीएससीतर्फे १६ परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहे. सरकारकडून संबंधित संवर्ग किंवा पदांसाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल, या गृहितकाच्या आधारे संभाव्य वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.

शासनाकडून वेळेत मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल परीक्षेद्वारे भरावयाच्या पदसंख्येबाबतचा तपशील अधिसूचना, जाहिरातीद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. हे वेळापत्रक संभाव्य असून त्यामध्ये बदल होऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे. असा बदल झाल्यास त्याबाबतची माहिती वेबसाइटवर देण्यात येणार असल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले. त्यामध्ये महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा अशा परीक्षांचा समावेश आहे. संभाव्य वेळापत्रकात परीक्षेचे स्वरुप, जाहिरात प्रसिद्ध होण्याचा महिना नमूद करण्यात आला आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी एमपीएससीच्या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांच्या संभाव्य तारखा :

  • दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ष पूर्व परीक्षा – १७ मार्च
  • महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २८ एप्रिल
  • महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क संयुक्त सेवा पूर्व परीक्षा – १६ जून
  • राज्यसेवा मुख्य परीक्षा – १४ ते १६ डिसेंबर
  • महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – २३ नोव्हेंबर
  • अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा – ९ नोव्हेंबर
  • महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा -२३ नोव्हेंबर
  • महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा -२३ नोव्हेंबर
  • महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा – २८ ते ३१ डिसेंबर

Source link

competitive examinationmaharashtra public service commissionmpsc 2024mpsc exam datesmpsc exam timetablempsc exam timetable 2024एमपीएससीएमपीएससी परीक्षाएमपीएससी वेळापत्रकस्पर्धा परीक्षा
Comments (0)
Add Comment