तीनवेळा नापास, पण मानली नाही हार… क्रिकेटप्रेमी आयपीएस अधिकारी कार्तिक मधीराची यशोगाथा

Career Success Story IPS Karthik Madhira : क्रिकेटची आवड नाही असा जगात कोणी शोधून सापडणार नाही. क्रिकेट खेळणारे आणि क्रिकेट पाहणारे, मात्र क्रिकेट फॅन्स असणे हा त्या प्रत्येकातील एक दुवा असतो. त्यामुळे अनेकांचे या क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न असते. भरपूर पैसा आणि प्रसिद्धी मिळवून देणार्‍या क्रिकेटविश्वाचे अनेकांना आकर्षण असते. मात्र, क्रिकेट सोडून सरकारी सेवेत रुजू झाल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का ? आयपीएस कार्तिक मधीरा हे असेच एक नाव. महाराष्ट्र केडरचा IPS अधिकारी असणार्‍या कार्तिकचा एक क्रिकेटर IPS अधिकारी हा प्रवास जाणून घेऊया…

(फोटो सौजन्य : IPS Karthik Madhira Instagram)

क्रिकेट सोडावे लागले कारण :

कार्तिक मधीरा हा मूळचा हैदराबादचा रहिवाशी. महाराष्ट्र केडरचा विद्यार्थी कार्तिक मधीरा, भारतीय पोलीस सेवेत रुजू होण्यापूर्वी, त्याने १३,१५, १७ आणि १९ वर्षांखालील गटांमध्ये क्रिकेट खेळला आहे. पण काही कारणांमुळे त्याच्या करिअरला वेगळी दिशा मिळाली.

कॉम्प्युटर इंजिनीअरिंगमध्ये पदवीधर आहे कार्तिक :

कार्तिकने जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (JNTU) मधून कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनीअरिंगमधून पदवी संपादन केली आहे. इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्याने काही काळ खासगी क्षेत्रात नोकरीही केली आहे. क्रिकेट सोडून IPS बनण्यामागे कार्तिकला झालेली दुखापत आणि काही वैयक्तिक कारणे होती. दरम्यान, स्पर्धा परीक्षा देऊन देश सेवा करण्याचे ठरवून त्याने जिद्दीने अभ्यास केला.

(वाचा : ‘करिअरमध्ये काहीच घडणार नाही’ म्हणणाऱ्यांना चपराक देत ठरला यशस्वी Influencer, शिक्षणातही अव्वल पुणेरी प्रतीक)

तीनवेळा झाला नापास पण मानली नाही हार :

कार्तिकने लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी फॉर्म भरला. कार्तिकला यूपीएससीच्या पहिल्या तीन प्रयत्नांमध्ये सतत अपयशाचा सामना करावा लागला. एवढेच नव्हे त्याला पूर्व परीक्षाही पास होणे जमले नव्हते. मात्र, कार्तिकाने त्याने हार न मानता आपली तयारी सुरुच ठेवली. समाजशास्त्र या पर्यायी विषयाच्या अभ्यासावर त्याने जास्त भर दिला.

UPSC च्या वेगवेगळ्या फेऱ्यांची तयारी करण्याऐवजी त्याने एकाच वेळी पूर्ण तयारी करण्यावर भर दिला. कार्तिकने अवलंबलेली रणनीती अखेर कामी आली आणि २०१९ मध्ये परीक्षेच्या चौथ्या प्रयत्नात त्याने यश मिळवले आणि संपूर्ण भारतातून १०३ वा क्रमांक पटकावून कार्तिक IPS अधिकारी झाला.

असे होते अभ्यासाचे प्लॅनिंग :

कार्तिकने अभ्यास करताना विशेष धोरणे अवलंबली. त्याने UPSC परीक्षेची सर्वांगीण दृष्टिकोन ठेवून तयारी केली. अभ्यास करताना सतत उजळणी करण्याचे त्याने ठरवले होते आणि त्या गोष्टीचे तंतोतंत पालनही केले होते. पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी त्याने मॉक टेस्ट सोडवण्यावर भर दिला आणि लेखन कौशल्यही सुधारले. याशिवाय त्याने व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

(वाचा : Success Story IAS Kartik Jivani: आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो तीनवेळा स्पर्धा परीक्षेला बसून तीनही वेळा यशस्वी झाला)



Source link

Indian Police ServiceIPS Karthik MadhiraIPS Karthik Madhira EducationKarthik Madhira Educationkarthik madhira instagramkarthikmadhira.ipsआयपीएस कार्तिक मधीराकार्तिक मधीरा
Comments (0)
Add Comment