दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ‘पूर्व मध्य रेल्वे’ अंतर्गत अप्रेंटीस पदासाठी महाभरती

East Central Railway Apprentice Recruitment 2023: तुम्ही जर दहावी उत्तीर्ण असाल आणि आयटीआय परीक्षा अभ्यासक्रम पूर्ण केला असेल तर रेल्वे मध्ये मोठी सुवर्णसंधी आहे. ‘पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत’ महाभरती प्रक्रिया राबवण्यात आली आसून या माध्यमातून अप्रेंटीस म्हणजेच प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण १८३२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच पूर्व मध्य रेल्वेने याबाबत अधिसूचना जाहीर केली आहे.

या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणार्‍या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून ०९ डिसेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरती पदे, पदसंख्या, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘पूर्व मध्य रेल्वे भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
विविध ट्रेड मधील एकूण प्रशिक्षणार्थी – १८३२ जागा

शैक्षणिक पात्रता: दहाव परीक्षा उत्तीर्ण आणि संबधित ट्रेड मधील आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

अर्ज शुल्क: १०० रुपये

वयोमर्यादा: कमाल वय २४ वर्षे. कमाल वयोमर्यादेत ओबीसी प्रवर्गाला ३ वर्षे तर एससी/एसटी प्रवर्गाला ५ वर्षे सवलत आहे.

(वाचा: National Education Day 2023: का साजरा केला जातो राष्ट्रीय शिक्षण दिन? जाणून घ्या सविस्तर इतिहास)

अर्ज पद्धती: ऑनलाईन

निवड प्रक्रिया: मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०९ डिसेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘पूर्व मध्य रेल्वे’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरतीकरिता थेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच ०९ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: Satara Medical College Bharti 2023: शासकीय मेडिकल कॉलेज, सातारा येथे भरती; ‘या’ पदांसाठी आजच अर्ज करा)

Source link

apprentice recruitment 2023East Central Railway bharti 2023East Central Railway recruitment 2023RRC ECR bharti 2023RRC ECR Recruitment 2023पूर्व मध्य रेल्वे अप्रेंटीस भरती २०२३पूर्व मध्य रेल्वे भरती २०२३
Comments (0)
Add Comment