नुकतीच याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून या पदासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून ०६ डिसेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पात्रत, अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती पाहूया.
‘चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
चीफ अकाऊंट ऑफिसर / मुख्य लेखाधिकारी – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या: ०१ जागा
शैक्षणिक पात्रता: संबधित कामाशी निगडीत पदवी उत्तीर्ण आवश्यक असून या पदाच्या समकक्ष कामाचा ५ वर्षांचा अनुभव गरजेचा आहे. त्या संदर्भातील सविस्तर तपशील अधिसूचनेत नमूद केले आहेत. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली आहे.
(वाचा: RRC ECR Recruitment 2023: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ‘पूर्व मध्य रेल्वे’ अंतर्गत अप्रेंटीस पदासाठी महाभरती)
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज पद्धती: ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, लॉ कॉलेज रोड, एरंडवणे, पुणे ४११००४.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०६ डिसेंबर २०२३
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच ०६ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
(वाचा: Tips For History Study: इतिहास शिकताना तारखा लक्षात ठेवणं कठीण जातय? मग ‘या’ सोप्या टिप्स एकदा वाचा)