नुकतीच याबाबत ‘एनआयव्ही’ कडून अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखत माध्यमातून निवड केली जाणार आहे. या मुलाखती २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता, वेतन याबाबतची सविस्तर माहिती पाहूया.
‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-II -०४ जागा
प्रोजेक्ट डेटा एंट्री ऑपरेटर – ०१ जागा
प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-I – ०८ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – १३ जागा
शैक्षणिक पात्रता:
प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट – II – विज्ञान विषयात बारावी परीक्षा उत्तीर्ण आणि (MLT/DMLT) मध्ये डिप्लोमा आणि संबंधित कामाचा पाच वर्षांचा अनुभव.
प्रोजेक्ट डेटा एंट्री ऑपरेटर – मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून बारावी परीक्षा उत्तीर्ण आणि अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे संगणकीय कामाचा वेग तसेच दोन वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव.
प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-I – दहावी आणि (MLT/DMLT/ITI) मध्ये डिप्लोमा आणि संबंधित कामाचा दोन वर्षांचा अनुभव.
(या व्यतिरिक्त विस्तृत पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली आहे.)
वेतन: (मासिक)
प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-II – २० हजार आणि इतर भत्ते
प्रोजेक्ट डेटा एंट्री ऑपरेटर – १७ हजार आणि इतर भत्ते
प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-I – १८ जागा आणि इतर भत्ते
नोकरी ठिकाण: पुणे
निवड प्रक्रिया: मुलाखतीद्वारे
मुलाखतीचा पत्ता: आयसीएमआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीचे कॉन्फरन्स हॉल, २० -अ, डॉ. आंबेडकर रोड, पुणे- ४११००१.
मुलाखतीची तारीख:
प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-II – २९ नोव्हेंबर २०२३
प्रोजेक्ट डेटा एंट्री ऑपरेटर – २९ नोव्हेंबर २०२३
प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-I – ३० नोव्हेंबर २०२३
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
(वाचा: RRC ECR Recruitment 2023: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ‘पूर्व मध्य रेल्वे’ अंतर्गत अप्रेंटीस पदासाठी महाभरती)