criticism on cm uddhav thackeray: मुख्यमंत्री ठाकरे, संजय राऊत यांच्यावर गुन्हे दाखल करा; भाजप महिला आमदाराची मागणी

हायलाइट्स:

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हे दाखल करा- भाजप आमदार देवयानी फरांदे यांची मागणी.
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हल्लेखोर शिवसैनिकांचे अभिनंदन करून गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ देत आहेत- फरांदे.
  • हल्लेखोर शिवसैनिकांना सत्तेचा वापर करून शिवसेना लपवत आहे- फरांदे.

नाशिक: केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या अटकेनंतर राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष उभा राहिला आहे. दोन्ही पक्षांचे नेते या प्रकरणाबाबत वक्तव्ये करत असून त्यावरून हा संघर्ष अधिकच तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आता भाजपच्या आमदार देवयानी फरांदे (MLA Devyani Farande) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणीच केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे हल्लेखोर शिवसैनिकांचे अभिनंदन करून गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ देत आहेत, असा आरोपही फरांदे यांनी केला आहे. (bjp mla devyani farande criticizes cm uddhav thackeray and mp sanjay raut over narayan rane issue)

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्यांतर शिवसैनिकांनी आमच्या कार्यालयावर दगडफेक केली. काचा फोडल्या. आमच्या शिपायाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र २४ तास उलटून गेल्यावरही हे शिवसैनिक सापडलेले नाहीत. आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की हे शिवसैनिक मुंबईतील आरे कॉलनी, वरळी, नरिमन पॉइंटमध्ये आहेत.

क्लिक करा आणि वाचा- ”ते’ आत जाईपर्यंत गप्प बसणार नाही’; नारायण राणेंचा ‘या’ मंत्र्यांना इशारा

आक्रमक झालेल्या शिवसैनिकांना पक्ष आणि सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोपच यावेळी आमदार फरांदे यांनी केला. या शिवसैनिकाना शिवसेना सत्तेचा वापर करून लपवत आहे. मुख्यमंत्री शिवसैनिकांचे अभिनंदन करत आहेत. अशा प्रकारे ते गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ देत आहेत, असा थेट आरोप फरांदे यांनी केला आहे.

क्लिक करा आणि वाचा- तुम्ही माझं काही करू शकणार नाही, मी सर्वांना पुरून उरलोय; राणेंचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

फरांदे यांनी शिवसेनेच्या सामना या मुखपत्रात छापून आलेल्या अग्रलेखावरही टीका केली. आज सामन्यातील अग्रलेखाचे होर्डिंग चौकात लावले गेले. यात नाशिक शहरात अशांतता निर्माण होईल अशा प्रकारचा मजकूर आहे. सामनावर कारवाई करून संपादकांवर गुन्हा दाखल करावा, अशी भाजपची मागणी असल्याचे त्या म्हणाल्या.

क्लिक करा आणि वाचा- युवा सेनेच्या वरुण सरदेसाईंविरोधात मनसे आक्रमक; दिली ‘ही’ उपमा

Source link

cm uddhav thackeraymla devyani farandeNarayan Raneआमदार देवयानी फरांदेनारायण राणेमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Comments (0)
Add Comment