दहावी पास उमेदवारांसाठी टाटा मेमोरियरल सेंटर, मुंबई येथे नोकरीची सुवर्णसंधी

Tata Memorial Centre Recruitment 2023: मुंबईकरांसाठी एक चांगली सुवर्णसंधी चालून आली आहे. टाटा मेमोरेरियल सेंटर आणि हॉस्पिटल येथे दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी आहे. या भरतीद्वारे अटेंडंट आणि ट्रेड हेल्पर या पदांच्या एकूण ५० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच याबाबत टाटा मेमोरियल सेंटर यांनी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे.

या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून १७ नोव्हेंबर २०२३ अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील या भरतीमधील पदे, पात्रता, वेतन याबाबतची सविस्तर माहिती पाहूया.

‘टाटा मेमोरेरियल सेंटर आणि हॉस्पिटल भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
अटेंडंट – २७ जागा
ट्रेड हेल्पर – २३ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ५० जागा

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबधित कामाचा एक वर्षाचा अनुभव असावा.

(वाचा: NIV Pune Recruitment 2023: पुण्यातील ‘एनआयव्ही’ इन्स्टिट्यूटमध्ये विविध पदांची भरती, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड)

नोकरी ठिकाण: परेल/ मुंबई

वेतन: १८ हजार रुपये (मासिक)

वयोमर्यादा: कमाल २५ वर्षे. कमाल वयोमर्यादेत ओबीसी प्रवर्गाला ०३ वर्षांची तर एससी/एसटी प्रवर्गाला ५ वर्षांची सवलत आहे.

अर्ज शुल्क: ३०० रुपये. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क माफ आहे.

अर्ज पद्धती: ऑनलाईन

निवड प्रक्रिया: लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १७ नोव्हेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘टाटा मेमोरियरल सेंटर, मुंबई’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच १७ नोव्हेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: ISRO Recruitment 2023: दहावी पास उमेदवारांसाठी ‘इस्रो’ मध्ये सुवर्णसंधी, आजच करा अर्ज)

Source link

Tata Memorial Center Recruitment 2023Tata Memorial Hospital Recruitment 2023TMC Mumbai Bharti 2023TMC Mumbai Recruitment 2023टाटा मेमोरियरल सेंटर भरती २०२३टाटा मेमोरियरल हॉस्पिटल भरती २०२३
Comments (0)
Add Comment