CAT 2023 Mock Test and Main Examination Dates: कॅटच्या परीक्षेला फक्त दोन आठवडे उरले असून, कॅट २०२३ ची परीक्षा २६ नोव्हेंबर २०२३ रोजी होणार आहे. त्याच वेळी, उमेदवारांना परीक्षेच्या तयारीसाठी मदत करण्यासाठी, CAT 2023 ची मॉक टेस्ट सक्रिय करण्यात आली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in वर जाऊन मॉक टेस्ट देऊ शकतात .
CAT 2023 मॉक टेस्ट ऑनलाइन होईल. CAT 2024 परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार दिलेल्या लॉगिन क्रेडेन्शियल्सचा वापर करून लॉग इन करून मॉक टेस्ट देऊन प्रॅक्टीस करू शकतात. शिवाय, मॉक टेस्टचा प्रयत्न करण्यापूर्वी उमेदवारांना दिलेल्या सूचना तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
CAT 2023 मॉक टेस्ट ऑनलाइन होईल. CAT 2024 परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार दिलेल्या लॉगिन क्रेडेन्शियल्सचा वापर करून लॉग इन करून मॉक टेस्ट देऊन प्रॅक्टीस करू शकतात. शिवाय, मॉक टेस्टचा प्रयत्न करण्यापूर्वी उमेदवारांना दिलेल्या सूचना तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
(वाचा : Jobs Openings At Swiggy : स्विगीमध्ये अकाऊंट मॅनेजर पदासाठी रिक्त जागा, फ्रेशर्स उमेदवारांनाही करता येणार अर्ज)
CAT 2023 ची मॉक टेस्ट देण्यासाठी :
- पायरी १ : CAT 2023 च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या मॉक टेस्ट लिंकवर क्लिक करा.
- पायरी २: नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड प्रविष्ट करा आणि साइन इन वर क्लिक करा.
- पायरी ३: आता सामान्य सूचना वाचा.
- पायरी ४: पुढील पृष्ठावर जाण्यासाठी NEXT वर क्लिक करा.
- पायरी ५: उमेदवारांना जारी केलेल्या इतर महत्त्वाच्या सूचना वाचा.
- पायरी ६: आता मॉक टेस्ट द्या.
CAT 2023 ची परीक्षा २६ नोव्हेंबर २०२३ रोजी घेण्यात येणार आहे. नियुक्त केलेल्या परीक्षा केंद्रांवर तीन स्लॉटमध्ये ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. CAT 2023 ची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या लिंकद्वारे प्रवेशपत्र डाउनलोड करावे. कारण प्रवेशपत्राशिवाय कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
CAT 2023 परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना देशभरातील IIM आणि इतर सरकारी आणि खाजगी महाविद्यालयांमध्ये MBA सह इतर व्यवस्थापन अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश दिला जातो.
(वाचा : All India Bar Examination 2023 : १० डिसेंबरला ऑल इंडिया बार परीक्षा; १६ नोव्हेंबरपर्यंत करता येणार ऑनलाइन अर्ज)