हायलाइट्स:
- पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील एका उपनिरीक्षकाची हॉटेलमध्ये जात दमदाटी.
- पोलिस उपनिरीक्षकाकडून खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघड.
- याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात त्या उपनिरीक्षकावर खंडणीचा गुन्हा दाखल.
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील एका उपनिरीक्षकाने मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेलमध्ये जाऊन दमदाटी करत खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात त्या उपनिरीक्षकावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (the police sub inspector of the pimpri chinchwad commissionerate was collecting the ransom)
याबाबत मारूती कोंडीबा गोरे (वय ३१, रा. केदेश्वर कॉम्प्लेक्स, मांगडेवाडी, कात्रज) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार उपनिरीक्षक मिलन कुरकुटे (वय २८) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरे याने लोकल हॉटेल, वन लॉन्ज, हॉटेल कार्निव्हल, हॉटेल धमका आणि हॉटेल मेट्रो येथून मंगळवारी रात्री दहा ते साडे दहा दरम्यान पैसे उकळ्याचे समोर आले आहे.
क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्री ठाकरे, संजय राऊत यांच्यावर गुन्हे दाखल करा; भाजप महिला आमदाराची मागणी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढव्यातील एबीसी रस्त्यावरील हॉटेल लोकल या ठिकाणी तक्रारदार हे मॅनेजर आहेत. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास पोलिस गणवेशात एकजण हॉटेलमध्ये आला. त्याने मी पोलिस कमिशन ऑफिसमधून आलो असल्याचे सांगत कारवाईची धमकी दिली. कारवाई टाळण्यासाठी त्यांच्याकडे दोन हजार रूपयांची मागणी केली. त्यांच्याकडून दोन हजार रूपये घेत एकामधून निघून गेला. तसेच, हॉटेल वन लॉन्ज या ठिकाणी जाऊन देखील मॅनेजर साहिल पित्रे यांना कारवाईची भिती दाखवून दोन हजार रूपये घेतले. तर, हॉटेल कॉर्निव्हल येथून तीन हजार रूपये घेतले आहेत. तसेच, हॉटेल मेट्रो आणि हॉटेल धमका येथे येथे जाऊन खंडणीसाठी धमकाविल्याचे समोर आले आहे.
क्लिक करा आणि वाचा- ”ते’ आत जाईपर्यंत गप्प बसणार नाही’; नारायण राणेंचा ‘या’ मंत्र्यांना इशारा
याप्रकरणी वरिष्ठ निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एच. एस. गिरी हे अधिक तपास करत आहेत.
क्लिक करा आणि वाचा- ‘तुम्ही माझं काही करू शकणार नाही, मी सर्वांना पुरून उरलोय’; राणेंचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र