पदवीधर उमेदवारांसाठी मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ पदांसाठी आजच अर्ज करा

BMC Nair hospital Recruitment 2023: तुम्ही जर पदवीधर असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर मुंबई महापालिकेत नोकरीची उत्तम संधी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत ‘डेटा एंट्री ऑपरेटर’ पदाच्या एकूण ०२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच याबाबत पालिकेने अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. ही भरती मुंबईतील ‘नायर रुग्णालया’ साठी होणार आहे.

या भरतीमधील पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून २३ नोव्हेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पात्रता, वेतन आणि अर्ज कसा करावा याबाबतची सविस्तर माहिती पाहूया.

‘बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२३’ पदे आणि पदसंख्या:
डेटा एंट्री ऑपरेटर – ०२ जागा
एकूण रिक्त पदसंख्या: ०२ जागा

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही विद्याशाखेतून पदवीधर, एमएस- सीआयटी, टायपिंग स्किल, मराठी आणि इंग्रजी भाषेचे उत्तम ज्ञान आणि संबधित कामाचा ०६ महिन्यांचा अनुभव.

(वाचा: TMC Mumbai Recruitment 2023: दहावी पास उमेदवारांसाठी टाटा मेमोरियरल सेंटर, मुंबई येथे नोकरीची सुवर्णसंधी)

वयोमर्यादा: कमाल वय ३८ वर्षे

वेतन/ मानधन: १५ हजार (मासिक)

नोकरी ठिकाण: मुंबई.

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २३ नोव्हेंबर २०२३

अर्ज पाठविण्याचा पत्ता: डिस्पॅच सेक्शन, तळमजला, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलची जी बिल्डिंग, मुंबई – ४००००८.

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘बृहन्मुंबई महानगरपालिका’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: NIV Pune Recruitment 2023: पुण्यातील ‘एनआयव्ही’ इन्स्टिट्यूटमध्ये विविध पदांची भरती, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड)

Source link

bmc bharti 2023bmc recruitment 2023mumbai Municipal Corporation jobsबृहन्मुंबई महानगर पालिका भरती २०२३मुंबई महानगरपालिका भरतीमुंबई महापालिका भरती २०२३
Comments (0)
Add Comment