राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकानुसार तसेच दैनदिन रुग्णसेवेच्या व विद्यार्थ्याच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीकोनातून ही भरती करण्यात येणार आहे. नुकतीच याबाबत अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणार्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून ३० नोव्हेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता, वेतन याबाबतची सविस्तर माहिती पाहूया.
‘शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग- रायगड भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
प्राध्यापक – ०६ जागा (विविध विषयांचे)
सहयोगी प्राध्यापक – १२ जागा (विविध विषयांचे)
एकूण रिक्त पदसंख्या: १८ जागा
शैक्षणिक पात्रता: संबधित विषयात एमडी/ एमएस/ डीएनबी
(वाचा: IIT Bombay Recruitment 2023: ‘आयआयटी बॉम्बे’ मध्ये ‘या’ महत्वाच्या पदासाठी भरती, वेतन पाहून थक्क व्हाल)
वेतन: (मासिक)
प्राध्यापक – २ लाख रुपये
सहयोगी प्राध्यापक – १ लाख ८५ हजार रुपये
नोकरी ठिकाण: अलिबाग, रायगड
वयोमर्यादा: कमाल वय ६९ वर्षे
अर्ज पद्धती: ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० नोव्हेंबर २०२३
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, मुंबई’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच ३० नोव्हेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
(वाचा: BMC Recruitment 2023: पदवीधर उमेदवारांसाठी मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ पदांसाठी आजच अर्ज करा)